

मेष : आत्मविश्वास वाढेल. पार्टनरचा सल्ला उपयोगी ठरेल. दिवसभर महत्वाच्या कामात व्यग्र राहाल. जमिनीशी संबंधित कामे पूर्ण होतील.
वृषभ : नवीन योजना आखण्यासाठी वेळ मिलेल. कुटुंबाची साथ लाभेल. वादापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. रागावर नियंत्रण ठेवावे.
मिथुन : व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात मन लागेल. कुटुंबातील सदस्यांचे पैसे खर्च करणे टाळावे. प्रत्येक काम काळजीपूर्वक करावे.
कर्क : कोणताही मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्याल. धार्मिक कार्यात मन लागेल. व्यवसायाशी संबंधित कामे पूर्ण होतील.
सिंह : एखाद्या गोष्टीशी दिवसभर चिंता सतावेल. हितशत्रूपासून सावधान राहावे लागेल. तुम्हाला आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे लागेल.
कन्या : जमिनीशी संबंधित निर्णय घाईत घेऊ नये. हितशत्रू तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे .
तुला : मन प्रसन्न राहील. धन लाभाचा योग आहे. कुटुंबात स्नेह वाढेल. पांढरा रंग शुभ ठरेल.
वृश्चिक : तुम्हाला कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
धनु : सुख-सुविधांवर खर्च वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण कराल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर : दिवसभरात महत्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. मन चिंतेत राहील. कुटुंबाशी कोणतीही गोष्ट लपवू नये.
कुंभ : कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यास प्रयत्न कराल. कामानिमित्त लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. कर्ज काढून व्यवसायात पैसा लावू नये.
मीन : कोणत्याही कामात घाई करणे टाळावे. सुख-सुविधांवर अधिक खर्च कराल. व्यवसायात घाई गडबडीत निर्णय घेऊ नका.
Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. दिवसभरात कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.