Horoscope: शनी प्रदोष व्रताचे होणार फलित; ५ राशींचे संकट टळणार, येणार अच्छे दिन

Horoscope in Marathi : शनीदेवाची कृपा काही राशींवर होणार आहे. १२ राशींपैकी ५ राशींचे वाईट दिवस आणि अडचणीचे दिवस दूर होणार आहेत.
Horoscope News
Horoscope Today Saam tv
Published On

शनिवारी,२४ मे २०२५,वैशाख कृष्णपक्ष,

शनिप्रदोष.

तिथी-द्वादशी १९|२०

रास-मीन १३|४८ नं. मेष

नक्षत्र-रेवती

योग- आयुष्मान

करण-कौलव

दिनविशेष-१९ प.चांगला

मेष - आयुष्यामध्ये अडचणी आल्याशिवाय चांगले असणाऱ्या गोष्टींची किंमत कळत नाही. आज अडचणी येते पण अध्यात्मामुळे तराल. मोठी नियोजन करताना त्रेधातिरपीट उडेल. कदाचित पैशाशी निगडित मोठे व्यवहार होतील.

वृषभ - आपल्या राशीचे प्रतीकच बैल आहे. नेटाने आणि सातत्याने आपण कष्ट करता. अर्थात त्याचे फळ आज तुम्हाला मिळणार आहे. जुन्या केलेल्या गोष्टींच्या मधून चांगला आर्थिक फायदा होईल. नव्याने परिचय होतील.

मिथुन- समाजात वावरायला आपल्याला आवडते. बोलून समोरच्याचे मन तुम्ही जिंकता. आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आघाडीवर राहाल. ठरवलेल्या गोष्टी तशाच झाल्यामुळे कामाला नव्याने हुरूप येईल.

कर्क - आज शनी प्रदोष आहे. शिव शनी उपासना आज फलदायी ठरणार आहे. उशीर झाला तरी देवाने अनेक गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत हे नाकारता येणार नाही. आज अशाच काही भाग्यकारक घटना तुमच्या नशिबात घडणार सुद्धा आहेत.

सिंह - राजकीय कामांमध्ये अडचणी उद्भवतील. कदाचित राजदंड, लाचलुचपत व्यवहार, भ्रष्टाचार यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. सजग राहून कामे करावीत तर दिवस आपला आहे.

कन्या - व्यवहारामध्ये हिशोब चुकता ठेवावा लागेल. भागीदारी मध्ये नव्या घटना घडामोडी घडतील. समोरच्याचा कल बघून कामे करावी लागतील. कोर्टाच्या कामात आज यश मिळेल.

तूळ -मूत्राशयाचे त्रास, स्त्रियांना गायनिक कटकटी अशा गोष्टी आज काही लोकांना सतावतील. तब्येत जपावी हा संदेश आहे. नोकरीच्या ठिकाणी मात्र सगळे छान होईल. दिवस संमिश्र आहे.

वृश्चिक - शनि प्रदोष आहे. शिव, शनी उपासना उआज दोन्हीही फलदायी आहेत. शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन काहीतरी शिकण्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर आज आगेकुछ होईल.

धनु- धार्मिक कार्यामध्ये पुढाकार घ्याल. जनावरे, शेतीवाडी निगडित व्यवहार होतील. विशेषतः क्रयविक्रियांमध्ये सहभाग घ्याल. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लागतील. दिवस चांगला आहे.

मकर - चिकाटीने यशाची हंडी गवसेल. संयम हा तुमचा गुण आहे याच पद्धतीने पुढे जाल. कासवाची गती असली तरी जिंकण्याचे गुण आपल्याकडे मुळातच आहेत.

कुंभ - आपली शनी प्रधान असणारी रास. कुटुंबामध्ये वावरताना आज सावधगिरी बाळगा. कदाचित टोचरे बोलण्यामुळे आपल्या जवळचे कोणीतरी दुखावले जाण्याची शक्यता आहे. बाकी सुवर्ण, रोख पैसा इतर गुंतवणूक यासाठी दिवस चांगला आहे.

मीन - आत्मविश्वासाने वावराल. भविष्याचा विचार करून काही गोष्टी नियोजित कराल. व्यवहारांमध्ये सतर्क राहाल. स्वतःच्या आनंदासाठी योग्य त्या गोष्टी करावी. देवधर्मात आवड निर्माण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com