Horoscope Today : अडचणींचा डोंगर उपसावा लागणार, तर काहींना मिळणार जुने प्रेम; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today in marathi : आज काही राशींच्या लोकाना अडचणींचा जोंगर उपसावा लागणार आहे. तर काहींना मिळणार जुने प्रेम मिळणार आहे.
Horoscope
Horoscope Today Saam tv
Published On

रविवार,१६ फेब्रुवारी २०२५,माघ कृष्णपक्ष,संकष्ट चतुर्थी.

तिथी- चतुर्थी २६|१६

रास- कन्या

नक्षत्र- हस्त

योग- धृति

करण- बवकरण

दिनविशेष- उत्तम दिवस

मेष - ठरलेल्या कामात अडचणी येण्याचा आजचा दिवस आहे. नोकरी व्यवसायामध्ये त्रास, पोटाची दुखणी कटकटीची ठरतील. दिवस संमिश्र आहे.

वृषभ - आज संकष्टी चतुर्थी आहे. गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल. ठरवलेल्या गोष्टी सुनियोजित आणि योग्य क्रमाने होतील. लॉटरी, शेअर्स आणि रेस मध्ये धनलाभाची शक्यता आहे.

मिथुन - घराचे व्यवहार पार पडतील. गाई, गुरे यांच्या खरेदी विक्रीतून फायदा होईल. शेतीशी निगडित कामे सहज होतील. आयात - निर्यातीचा विचार करत असाल तर त्या बैठका आज पार पडतील.

Horoscope
Vastu Shastra: तुळस दारासमोर ठेवताय? मग जाणून घ्या वास्तूचे 'हे' नियम, व्हाल धनवान

कर्क - छोट्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला दिसतो आहे. यामधून नवीन कामाच्या नव्या वाटा रुजू होतील. भावंडांचे सौख्य चांगले राहील. प्रगतीचे योग आहेत.

सिंह - वडिलोपार्जित धन याविषयी काही गोष्टी रखडलेल्या असतील तर आज मार्गी लागतील. कौटुंबिक एखाद्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हाल. आपला आब राखून राहण्याचे आज योग आहे.

कन्या - आपला आत्मविश्वास आणि महत्त्वकांक्षा वाढती राहील. सकारात्मक दृष्टिकोनाने आपले व्यक्तिमत्व बहरलेले राहील. बुद्धीचातुर्यावर समोरच्याला सहज जिंकाल.

Horoscope
Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस तोट्यात? रेल्वेने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

तूळ - व्यापाराचे नवीन प्रस्ताव येतील. पण त्याचबरोबर खर्चाला नवीन वाटाही फुटतील. अनावश्यक खर्च टाळा. अध्यात्माची कास धरा.

वृश्चिक - सुना मुलांचे प्रेम लाभेल. जुने संबंध मैत्रीमध्ये नवीन नाते संबंध प्रस्थापित होतील. धनलाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

धनु - कामाचे क्षेत्र व्यापक राहील. घेतलेले निर्णय अचूक ठरतील. प्रवास वाढतील. धावपळीचा असा आजचा दिवस आहे.vva

Horoscope
Vastu Tips: पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे? कपलने 'ही' चूक करूच नये; पाहा शास्त्र काय सांगतं?

मकर - संकष्टीचा दिवस आहे. आज गणेश उपासना आणि शिव उपासना एकत्रितरित्या केल्यास भाग्यकारक घटना घडतील. यशाला हुलकावणी देणारे प्रसंग आज संपुष्टात येतील. दिवस चांगला आहे.

कुंभ - अडचणींचा डोंगर उपसावा लागेल. शारीरिक कष्ट वाढतील. जोडीदारापासून धन मिळणे आज अपेक्षित आहे. दिवस बरा आहे.

मीन - कोर्टाशी निगडित गोष्टी आज पार पडतील. निकाल आपल्या बाजूने लागतील. वादविवादा मध्ये आपला पुढाकार राहील. जिंकण्याचा आलेख उंचावेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com