Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, 'या' राशींच्या व्यक्तींसाठी सोमवार भाग्याचा; कोणाला होणार मोठे लाभ? वाचा...

Daily Horoscope Today Marathi : आजचे राशीभविष्य, श्रावण कृष्णपक्ष. मंगळागौरी पूजन. तिथी-अमावास्या ०७|२६. मकर राशीसाठी संकटाचा, तर कुंभसाठी यशप्राप्तीचा दिवस, तुमच्या नशिबात आज काय?
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Daily Horoscope Today 9th August 2024Saam TV
Published On

आजचे पंचांग - सोमवार ९ सप्टेंबर २०२४. भाद्रपद शुक्लपक्ष. तिथी-षष्ठी २१|५४ रास-तुला ११|२९ नं. वृश्चिक. नक्षत्र-विशाखा. योग-वैधृति. करण-कौलव. दिनविशेष-वैधृति वर्ज्य.

मेष - तब्येतीच्या तक्रारी आज जाणवू शकतात. बाहेरचे खाणे टाळावे. पोटाचे आजार डोके वर काढतील. पित्तकारक, तिखट पदार्थ टाळा. तसेच तिखट लोकही टाळा. विनाकारण जीवनामध्ये कलह वाढवून घेऊ नका.

वृषभ - कर्ज, कोर्टकचेरी या गोष्टी मधून आज काही चांगले उपाय निघतील. मनासारख्या घटना घडण्यासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक सुखाला दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे.

मिथुन - कष्टाने पैसा आज मिळेल. आपल्या वस्तू जपाव्यात. नोकर लोकांपासून सावध राहण्याचा योग आहे. कुणालाही चढ्या आवाजात बोलू नका. विनाकारण त्रास वाढेल.

कर्क - शेअर्स आणि लॉटरी मध्ये पैशाचे योग आहेत. गुंतवणूक चांगली आणि फायदेशीर ठरेल. कला, मनोरंजनामध्ये सहभागी व्हाल. दिवस आनंदी राहील.

सिंह - घराविषयी काही गोष्टी असतील तर आज त्या सहज मार्गी लागतील. पशुधन हे धन जास्त महत्त्वाचे ठरेल. शेतीची कामे असतील तर त्याकडे जातीने लक्ष देण्याचा आजचा दिवस आहे.

कन्या - बोलण्यातली ताकद काय असते हे आपल्याला समजेल. आपल्या वक्तृत्वाने समोरच्या व्यक्ती गारद होतील. मुद्देसूद आणि हजरजबाबी पणे बोलल्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतील. पत्रव्यवहार होतील.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Shukraditya Yoga : ३६५ दिवसांनी कन्या राशीत बनणार शुक्रादित्य राजयोग; शुक्र-सूर्य यांच्या आशीर्वादाने 'या' राशींना मिळणार पैसा

तूळ - सोने अलंकार खरेदीचे योग आहेत. आपल्या घराण्याचा आज आपल्याला अभिमान वाटेल. पूर्वजांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

वृश्चिक - स्वतःच्याच प्रेमात पडण्याचा आज दिवस आहे. न बोलता कामे कराल. स्वमग्न राहाल. इतरांना मात्र तुमच्या या वागण्यामुळे आश्चर्य वाटेल शांततेचा संदेश द्याल.

धनु - खर्च वाढेल मानसिक ताणतणाव वाढ. परदेश गमनाच्या संधी येणार असतील तर त्याचे स्वागत करा. दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.

मकर - कनिष्ठांकडून आदर तर ज्येष्ठांकडून आपली कदर होईल. केलेल्या कामाची वाहवा मिळेल. नातेवाईकांच्या मध्ये मिळून मिसळून राहण्याचा आजचा दिवस आहे. अनेक लाभ पदरात पडतील.

कुंभ - कामासाठी प्रवासाचे योग आहेत. नवीन कामे येतील. त्यामध्ये रमून जाल. पैशाशी निगडित मोठे व्यवहार होण्याचा आजचा दिवस दिसतो आहे.

मीन - साधेपणाने जग जिंकता येते हे अगदी खणखणीतपणे आज सांगाल. देवधर्म, अध्यात्म यांत प्रगती होईल. तीर्थक्षेत्री भेटी होतील. दिवस भाग्याचा राहील.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Malavya rajyog: १० दिवसांनी तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com