Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींना आज 'बाप्पा' पावणार; सर्व अडचणी एका झटक्यात मिटणार

Horoscope Today 17 September 2024 : आजचे राशीभविष्य, मंगळवार १७ सप्टेंबर २०२४. भाद्रपदशुक्लपक्ष अनंत चतुर्दशी. प्रोष्ठपदी पौर्णिमा. या राशीच्या व्यक्तींना आज 'बाप्पा' पावणार; सर्व अडचणी एका झटक्यात मिटणार
तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Daily Horoscope Today Marathi Saam TV
Published On

आजचे पंचांग - मंगळवार १७ सप्टेंबर २०२४. भाद्रपदशुक्लपक्ष अनंत चतुर्दशी. प्रोष्ठपदी पौर्णिमा. तिथी-चतुर्दशी ११|४५. रास-कुंभ २९|४४ नं. मीन. नक्षत्र-शततारका. योग-धृति ०७|४८. शूल २७|४१. करण-वणिज. दिनविशेष-१२ प. चांगला.

मेष - कदाचित आज जुने मित्र भेटण्याचा आज दिवस आहे. पण थोड्या थोडक्या कारणावरून त्यांच्याशी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाती जपण्यासाठी डोके थंड ठेवा.

वृषभ - कामकाज सहजगत्या होण्याचा आजचा दिवस आहे. कामाबरोबर त्याचा आनंद लुटाल. इतरही गोष्टी ज्या जीवनात सुख देतात त्या कामाबरोबर आआज एन्जॉय कराल.

मिथुन- आपल्या बोलण्यामुळे आणि स्वभावामुळे परीचितांचा गोतावळा वाढेल. याच लोकांबरोबर अनेक चांगल्या गोष्टी आणि घटना घडताना आज दिसत आहेत. दूरचे प्रवास होतील.

कर्क- अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण त्याचबरोबर थोडा सावधानतेचा इशारा असा आपल्या स्वभावामुळे पैशाच्या वाईट गोष्टीत कुठे अडकणार नाहीत ना? याची काळजी घ्या.

सिंह - जोडीदाराबरोबर "तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना" असा आजचा दिवस आहे. काही गोष्टी ज्या आपण आधी ठरवल्या होत्या त्या पूर्णत्वाला जाताना दिसत आहेत. हे आज जाणवेल.

कन्या - अडचणींचा सामना पार करत आजवर इथे आला आहात. थोड्याच गोष्टी किनारी राहिल्या आहेत. "धीर धरा धीर धरी धीरापोटी फळे रसाळ गोमटी" असा सल्ला आहे.

तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

तूळ - आपण आजवर केलेल्या कर्माचे चांगले फळ मिळताना आज दिसत आहे. आपल्या पारड्यात आनंदाची लहर उठणार आहे. देवी उपासना फलदायी ठरेल.

वृश्चिक - कष्ट आणि मेहनत याला पर्याय कधीच नसतो. हे आपल्याला चांगलेच जाणवते. आज तारेवरची कसरत होईल एकाच वेळी १० कामे करण्याचे लीला आज आपण पार पडून टाकाल.

धनु - भावंडांचे सहकार्य लाभेल. कदाचित आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा लागेल. कौटुंबिक गोष्टींचे धुरा अंगावर घेऊन चालावे लागेल.

मकर - कंजूसपणा हा आपला गुण विनाकारण नाही. कारण यासाठी किती मेहनत आणि कष्ट करावे लागते हे आपल्याला चांगलेच माहित आहे. आज याचे फळ मिळेल. पैशाची आवक आणि धनाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

कुंभ - व्यक्तिमत्वाला एक वेगळा आयाम मिळेल. चांगल्या गोष्टी करण्यासाठी धडपड राहील. सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घ्याल.लोकांकडून आदर मिळवाल.

मीन - थोडासा दिवस त्रासाचा राहणार आहे. पण मनस्ताप करून घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास गोष्टी आटोक्यात राहतील. काही आजारांवर उपचारासाठी पैसे खर्च करावे लागतील.

तुमच्या भाग्यात आज काय? वाचा
Budhaditya Rajyog: अनंत चतुर्दशीला बनतोय बुधादित्य राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com