

श्री वासुदेव सत्रे
ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक, मोबाईल नंबर - 9860187085
आजचे राशीभविष्य, ५ जानेवारी २०२६
मेष - थोडं टेन्शन आणि स्वभावात आळस राहील. मनोस्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा.
वृषभ - कुठल्याही कामात सहज यश भेटेल. मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. विशेष कामाला प्राधान्य दिल्यास लवकर यश भेटेल.
मिथुन - वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. वाद झाल्यास माघार घेणं फायदेशीर राहील. घरातील वाद बाहेर कळणार नाही याची काळजी घ्या.
कर्क - अचानक धनलाभ होईल. भविष्यात होणाऱ्या घटनांच्या पूर्वसूचना मिळतील, त्या अंमलात आणल्यास भरपूर फायदा होईल.
सिंह - कौटुंबीक जीवन आनंदमय राहील. आजी-आजोबांची नातवंडांबरोबर भेट होईल. घरात अनेक दिवसांनंतर आनंदोत्सव घडेल.
कन्या - खूप विचार करून निर्णय घ्यावा. शत्रुचा त्रास होऊ शकतो. काळजी घ्यावी. तोंडातून अपशब्द वापरणे टाळावे.
तुला - नवीन वास्तू खरेदी करायची असल्यास आज शोध घ्यावा यश मिळेल. वैयक्तिक गोष्टी गूह्य ठेवाव्यात. एकट्याने आर्थिक व्यवहार करणे टाळावे.
वृश्चिक - अतिशय शिस्तबद्ध दैनंदिनी ठेवावी. विशेषतः पत्नीने पतीचे मन राखावे. घरातील स्त्रीने सौभाग्य अलंकार करून देवांची यथासांग पूजा करावी.
धनू - विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता मिळेल. अभ्यासात मन रमेल. गणपतीची उपासना करावी. वकीलांना करिअर मधे पूरेपूर यश मिळेल.
मकर - देवीची उपासना करावी, येणाऱ्या संकटांचं निवारण होईल. पैसे जपून खर्च करा. उसणे पैसे देणं टाळावं.
कुंभ - ज्ञानार्जन करण्यात वेळ घालवा. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. नवनवीन लोकांसोबत परिचय फायदेशीर राहील.
मीन - "मनी मानसी व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊनी जाते" असा एकंदरीत आजचा दिवस राहील. म्हणून अगदी निवांत रहावं. आणि आपल्या कार्यात मग्न रहावं. श्री रामाची उपासना भरपूर मदत करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.