Horoscope: वैवाहिक जीवनामध्ये वाढेल प्रेम, नकारात्मक गोष्टी टाळा; जाणून घ्या कसा असेल शनिवारचा दिवस

Horoscope Today in Marathi : ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या प्रत्येक राशीच्या चिन्हावर एक स्वामी ग्रह असतो, ज्याचा त्यावर सर्वात जास्त प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, २६ एप्रिल हा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे.
Horoscope News
Horoscope Today Saam tv
Published On

शनिवार,२६ एप्रिल २०२५ चैत्र कृष्णपक्ष,शिवरात्रि.

तिथी-त्रयोदशी ०८|२८

चतुर्दशी २८|५०

रास-मीन २७|३९ नं मेष

नक्षत्र- उत्तराभाद्रपदा ०६|२७

रेवती २७|३९

योग- वैधृती ०८|४१

विष्कंभ २८|३५

करण-वणिज ०८|२८

विष्टीकरण १८|४१

दिनविशेष-क्षयतिथी

मेष

काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थतेमधून जावे लागेल. अशा वेळी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे चांगले.

वृषभ

जिद्द आणि चिकाटीने कामाला लागाल. आर्थिक लाभ याचे प्रमाण वाढेल. नव्याने परिचय होतील. दिवस चांगला आहे.

मिथुन

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळलेले बरे. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. घराचे प्रश्न मार्गी लागतील.

Horoscope News
Rashi: पुढील आठवठ्यापासून तीन राशींचं चमकेल भाग्य; व्यवसाय आणि करिअरमध्ये होईल भरभराट

कर्क

गुरुकृपा लाभेल. शत्रू पिडा आज होणार नाही. आध्यात्मिक गोष्टींच्याकडे विशेष कल राहील. शिव उपासना फायद्याची ठरेल. मोठे प्रवास होतील.

सिंह

वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. मानसनमानांसाठी विशेष धडपड करावी लागेल. कदाचित आपला वापर अधिक करून घेतला जाईल. नको तिथे उदारता आज नकोच.

कन्या

वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा दिवस आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नकारात्मक गोष्टी जवळ येऊ देऊ नका.

तूळ

वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाणही वाढते राहील. कधी काय करावे आणि काही करू नये असा संभ्रम राहील. सगळे करूनही यश मिळत नाही असा काहीसा दिवस आहे.

वृक्षिक

मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी आज राहील.

धनु

महिलांना आरोग्याच्या तक्रारी आज जाणवतील. कामाचा ताण वाढेल. दगदग जाणवेल. पण जवळच्या लोकांच्या आधाराने दिवस निभवण्यात यश येईल.

Horoscope News
Rashi:'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे'! 'या' पाच राशींच्या जातकांचे होणार प्रमोशन, परदेशवारीची शक्यता

मकर

जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जवळचे प्रवास होतील. भावंड सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

कुंभ

व्यवसायामध्ये नवीन तंत्र मंत्र अमलात आणू शकाल. राहत्या जागेचे प्रश्न सहज मार्गी निघतील. पैसा जवळ असल्यामुळे चित्त थाऱ्यावर राहील.

मीन

मनोरंजनाकडे आज आपला कल राहणार आहे. आपली जे म्हणत आहात त्या विषयास ठाम आणि आग्रही रहाल. आपला प्रभाव इतरांवर पडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com