Horoscope Today : आज अचानक धनलाभाची शक्यता, आशावादी राहाल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today in Marathi : दिवाळीच्या शुभ दिवसावर काही राशींना अचानक धनालाभाची शक्यता आहे. तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा सविस्तर
Horoscope Today
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

रविवार,३ नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्लपक्ष,यमद्वितीया(भाऊबीज).

तिथी- द्वितीया २०|२२

रास- वृश्चिक

नक्षत्र- अनुराधा

योग- सौभाग्य

करण- बालव

दिनविशेष-आनंदी दिवस

मेष - प्रवास असेल तर वाहने जपून चालवावीत. विनाकारण कोणाच्या वाटेला जाऊन वाद-विवाद वाढवून घेऊन नयेत. ते टाळावेत दिवाळीच्या धावपळी मध्ये फटाक्यांपासून होणाऱ्या त्रासापासून काळजी घ्यावी.

वृषभ - मन आनंदी आणि आशावादी राहील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. कामाशी निगडित नवीन गोष्टी यांचे प्रस्ताव समोर येतील. वशिल्याने कामे होतील.

मिथुन- खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. कुठे थांबावे हे कळत नाही. अशी संदिग्ध अवस्था राहील. दिवाळीच्या धामधुमीत तब्येतीकडेही तितकेच लक्ष द्या. ते महत्त्वाचे आहे.

कर्क - बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्ये कलेला समर्पित असा आजचा दिवस आपला राहील.

सिंह- प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काही महत्त्वाच्या गोष्टी आणि घटना या संबंधी घडतील. आपले मार्गदर्शन इतरांसाठी योग्य ठरेल. कौटुंबिक वातावरण सणासुदीमुळे उत्साहाचे राहील.

Horoscope Today
Chanakya Niti: वयाच्या २० वर्षांनंतर 'या' चुका करूच नका; नाहीतर वाईट काळ सुरु झाला असं समजा

कन्या- भावंड सौख्यासाठी आज उत्साहाचा दिवस आहे. आपल्या राशीला विशेष बंधूप्रेम संबंध प्रस्थापित होण्याचा आजचा दिवस आहे. योगकारक घटना घडतील.

तूळ - काहीना अचानक धनालाभाची शक्यता आहे. व्यवसायामध्ये वाढ होईल. दिवाळीच्या शुभ दिवसावर पैशाची आवक-जावक चांगली राहील. आपले व्यवसाय वृद्धिंगत होतील.

वृश्चिक - दीपोत्सव तर छान सुरूच असेल. आज आपल्या कामाला नवीन दिशा, नवीन मार्ग सापडतील. मानसिक आणि स्वास्थ समाधान मिळण्याचा दिवस आहे.

धनु - काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे काम रखडण्याची शक्यता आज आहे. लांबचे प्रवास असतील तर खबरदारीने प्रवास करावे.

Horoscope Today
Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

मकर - अनेकांचे सहकार्य आज लागणार आहे. नातेवाईकांबरोबर स्नेहभोजन दिवस उत्साह आणि आनंदाचा असा आज राहील.

कुंभ - तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान प्रतिष्ठा आज मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रगतीपथावर प्रवास सुरू आहे आणि तो तसाच राहील. राजकारणी लोकांची मदत मिळेल.

मीन - धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग होईल. मनोबल वाढवणारी एखादी घटना घडणार आहे. नातवंडांच्या कडून सुखाच्या वार्ता ऐकायला मिळतील. दिवाळीच्या आनंदात भाग्यकारक गोष्टी घडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com