Horoscope: सावधान! अडचणींवर अडचणी येणार; रागावर नियंत्रण ठेवा,जाणून कसा असेल आजचा दिवस

Horoscope Today in Marathi : आठवड्याचा पहिला दिवस अनेकांना अडचणींना ठरणार आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
Rashi Bhavishya
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

सोमवार,१४एप्रिल २०२५,चैत्र कृष्णपक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती.

तिथी- प्रतिपदा ०८|२६

रास-तुला

नक्षत्र-स्वाती २४|१४

योग-वज्र

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष

काही कारण नसताना अचानक आपल्याला राग येतो. आज अशा गोष्टी टाळा. जोडीदार आपल्यामुळे दुखावला जाणार नाही ना याची काळजी घ्या. कामाचे व्याप वाढतील. त्याचा रोष दुसरीकडे जाऊ शकतो. नाती सांभाळा.

वृषभ

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आज मात्र दैनंदिन कामाला महत्त्व द्या. आपल्या ऐवजांना संभाळा. हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे.

मिथुन

विष्णू उपासना विशेष फलदायी ठरेल. मुलांच्या कडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. क्रीडा क्षेत्रात प्रगती आहे. शेअर्स मध्ये गती आहे.

कर्क

मी माझे या कोशातून बाहेर पडा. यात कोशात स्वतःला बांधून ठेवाल. कौटुंबिक सौख्य अलबेल राहील. मातृ सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. क्रियाविक्रयाला दिवस चांगला आहे.

सिंह

पत्र व्यवहार मार्गे लागतील. सुरळीतपणे कामे होतील. जुनी रखडलेली कामे आज आपसूक होतील. भावंड सौख्यच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्यावर त्यांची करार मदार राहील.

कन्या

ये रे ये रे पैसा असा दिवस आहे. धनलाभ भरपूर दिसतो आहे. गुंतवणुकीला फायदा होईल. विविध पदार्थ मेजवानीचा आजचा दिवस आहे.

तूळ

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी खटपट कराल. कलासक्त जीवन जगाल. नवीन खरेदी कराल. आपला प्रभाव वाढता राहील.

वृश्चिक

मोठे प्रवास घडतील. अनेक कामे एकट्यालाच पैलवावी लागतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. मनसिकता सांभाळा.

धनु

प्रेमात आपलेपण निर्माण होईल. मित्राची यामध्ये विशेष मदत होईल. एकत्रित रित्या स्नेहभोजनाचे योग एन्जॉय कराल. दिवस चांगला आहे.

मकर

समाजाची सहानुभूती मिळेल. तुम्ही समाजाला सहानभूती द्याल. एकमेका साहाय्य करू... अशा गोष्टीने दोघे पुढे जाल वरिष्ठांचे विशेष आशीर्वाद आपल्यावर आहेत.

कुंभ

कर्मकांडावर तसा फारसा विश्वास नाही. पण अशा अचानक गोष्टी आज घडतील की देवावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल. शुभ उपासना फलदायी ठरेल. दिवस आनंदी आहे.

मीन

अडचणीत अडचणी असा आजचा दिवस आहे. संदिग्धता निर्माण होईल. खऱ्या अर्थाने बुद्धीने मार्ग काढावा लागेल. अचानक पैसा मिळेल पण खोट्या मार्गाने नको. हे लक्षात ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com