Horoscope: वाहन खरेदी अन् आर्थिक लाभाचा योग; बुधवार ठरेल भाग्य चमकवणारा दिवस, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Wednesday Horoscope In Marathi: बुधवारचा दिवस १२ राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आजचा दिवस त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा ठरणार आहे. कोणत्या राशींसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घ्या.
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

बुधवार,२० ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,प्रदोष.

तिथी-द्वादशी १३|५९

रास-मिथुन १८|३५ नं.कर्क

नक्षत्र-पुर्नवसु

योग-सिद्धीयोग

करण-तैतिल

दिनविशेष-१४ प.चांगला

मेष

धाडस आणि धडाडीने आज कामे करणार आहात. यामध्ये स्वतःची प्रगती नक्कीच होणार आहे. प्रवासासाठी दिवस उत्तम आहे. आपल्या क्षेत्रामध्ये कर्तुत्व बहरण्याचा आजचा दिवस आहे.

वृषभ

मुळातच रसिक असणारी आपली रास आहे. सध्या सणाचे दिवस सुरू आहेत विशेषत्वाने कुटुंबीयांबरोबर खेळीमेळीचा वातावरणात आनंदाने आजचा दिवस घालवाल. उत्तम स्नेह भोजनाचे योग आहेत. खवय्यांसाठी सार्थकी लागणारा असा दिवस आजचा आहे.

मिथुन

रसरशीत, टवटवीत, आनंदी, प्रफुल्लित असणारी आपली रास. आज याहून अनेक गोष्टींनी आपल्या व्यक्तिमत्त्वात भर पडणार आहे. व्यक्तिमत्व उजळून निघेल.आनंदी जीवन जगण्याची जणू काही गुरुकिल्ली सापडली आहे असा दिवस आजचा आहे.

कर्क

" प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी" असा काहीसा दिवस आहे. कारण नसताना कटकटी वाढतील. प्रेमामध्ये अपयश संभवते आहे. पैसा किंवा खर्चाला धरबंद राहणार नाही. असा दिवस आहे. मानसिकता सांभाळा.

सिंह

आपली ऐट अशीच टिकून राहणार असा आजचा दिवस आहे. नवनवीन गोष्टींची प्रगतीची आजच्या दिवसात भर पडेल. विशेष लाभ आणि बहरलेला दिवस आजचा आहे. जवळच्या लोकांच्या स्नेहामध्ये न्हाऊन जाल.

कन्या

हिशोबाने गोष्टी आज कराव्या लागतील. मग त्या पैशाच्या असतील किंवा नात्याचा किंवा जवळच्या व्यक्तींच्या. आपल्यासाठी श्रेयस आणि श्रेयस हे ओळखून पुढे जावे लागेल.कामाच्या ठिकाणी प्रगतीपथावर राहाल.

horoscope in marathi
Budh Gochar 2025: सिंह राशीच्या घरात बुध ग्रहाच्या प्रवेशाने ८राशींचे वाढणार टेन्शन; नात्यात दुरावा अन् बसणार आर्थिक फटका

तूळ

देवी उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. तीर्थक्षेत्रि भेटी होतील .प्रवास घडतील. प्रवासातून आनंद मिळेल. संतती सुवर्ता कानावर येतील. दिवस उत्तम आहे.

वृश्चिक

आरोप प्रत्यारोप मनावर न घेता कामे करावे लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल. पण दिवसाच्या शेवटी यश मिळेल. कदाचित त्रस्त होऊन सर्व सोडून देण्याचा मार्गही स्वीकारावा का अशी भावना येईल. पण "आस्ते चलो" हे आपल्यासाठी आज लागू आहे.

धनु

व्यवसायामध्ये वृद्धी होईल. ठरवलेल्या गोष्टी तशाच होतील. नियोजित बैठका पार पडतील. प्रेमामध्ये पराक्रम गाजवाल. भाग्यातून लाभ होतील. दिवस सुखी समाधानी आहे.

मकर

जुनी दुखणी डोके वर काढतील. महत्त्वाच्या गोष्टीत एकट्यालाच निर्णय घेऊन पुढाकार घेऊन कामे करावी लागतील. हाताखालील लोकांकडून त्रास संभवतो आहे. महत्त्वाचे जिन्नस ऐवज सांभाळा. दिवस संमिश्र आहे.

कुंभ

बौद्धिक गोष्टी मध्ये कार्यरत रहाल. काही वेळेला "अकलेचे कांदे" असा काहीसा दिवस आपला आहे. नको त्या गोष्टीत नकारात्मक मन घुसविणे आज सोडा. सृजनशीलतेने काम केल्यास यश तुमचेच आहे. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

मीन

वाहन, खरेदी अथवा घर खरेदीसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. अनेक दिवस पडून राहिलेले निर्णय, रेंगाळत राहिलेल्या गोष्टी आज सहज होतील. आरोग्य उत्तम राहील. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com