Guru Purnima Horoscope: आज या 3 राशींचे भाग्य चमकणार, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न

Guru Purnima Rashifal 2024: यावर्षी गुरुपौर्णिमा २१ जुलै २०२४ म्हणजेच आहेआहे. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत, जे काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी या 3 राशींचे भाग्य चमकणार, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न
Guru Purnima HoroscopeSaam Tv
Published On

हिंदू धर्मात पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार महाभारताचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. वेद व्यास यांना पहिले गुरु मानले जाते. चार वेदांचे ज्ञान त्यांनीच मानवाला दिलं, असं म्हटलं जातं.

यावर्षी गुरुपौर्णिमा २१ जुलै २०२४ म्हणजेच आहेआहे. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत, जे काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी या 3 राशींचे भाग्य चमकणार, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न
Sun Transit : आजपासून या 5 राशींवर सूर्य देवाची होईल कृपा, प्रत्येक कामात मिळेल यश

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस खूप शुभ असणार आहे. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल असतील. मान-सन्मानात वाढ होईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खूश होतील. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

कुंभ

गुरु पौर्णिमेचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. नोकरीत नवीन संधी मिळतील. मानसिक तणावातून आराम मिळेल. अर्थार्जनाचे नवीन मार्ग समोर येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com