
शुक्रवार,१७ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष,रमा एकादशी,वसुबारस.
तिथी-एकादशी ११|१३
नक्षत्र-मघा
रास-सिंह
योग-शुक्ल
करण-बालव
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - आपल्यामध्ये असलेल्या क्रीडा शक्तीला आज ताजेतवानेपण मिळेल. शेअर्स मधील गुंतवणूक फायदेशीर राहणार आहे. गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल. आज दिपावलीचा पहिला दिवस धनदायक जाणार हे नक्की.
वृषभ - रमा एकादशी आणि वसुबारस अशा दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मनामध्ये असणाऱ्या सर्व कामना पूर्ण होणार आहेत. जमिनीचे व्यवहार, वाहनाशी निगडित गोष्टी आज परिपूर्णतेकडे जातील.
मिथुन - भावंड सौख्य ओसंडून मिळणार आहे. जवळच्या प्रवासातून फायदा होईल. भावनिक बंध शेजाऱ्यांशी तयार होतील. दिवस चांगला आहे.
कर्क - धन योगाला दिवस चांगला आहे. पैशाची आवक जावक उत्तम राहणार आहे. कुटुंबीयांच्या बरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. दिवाळीची सुरुवात धनालाभ दणक्यात होणार आहेत.
सिंह - मानसिकता उत्तम राहील. एखादा महत्त्वाचा सन्मान आपल्या शिरावर तुरा असल्यासारखा आज मिळेल. स्वतःमधील आत्मविश्वास वाढेल. दिवाळी सुखदायी जाणार अशी खात्री होईल.
कन्या - आकारण मनस्ताप वाट्याला येतील. खर्चाला धरबंध राहणार नाही. खरेदीसाठी पैसा खर्च होईल. मात्र हिशोब लागला नाही तर बेचैन वाटेल. दिवस संमिश्र आहे.
तुळ - मैत्रीचे बंध पक्के होतील. परदेशाशी निगडित व्यवहार, वार्तालाप,मैत्री बंध, प्रदर्शने यामध्ये आपले पाय घट्ट रोवले जातील. दिवाळी क्षणाच्या ऐन तोंडावर व्यवसायाशी निगडित नवीन कामे मिळतील.
वृश्चिक - योजलेल्या गोष्टी नियोजन केलेल्या गोष्टी त्याच मार्गाने होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये रस निर्माण होईल. सणाच्या गोष्टीचा आनंद द्विगुणीत होईल. नोकरी व्यवसायामध्ये बढतीचे योग आहेत. काळजी नसावी.
धनु - दत्तगुरूंची उपासना फलदायी ठरणार आहे. सणाचा आनंद वाढणार कारण अशी सुवार्ता आपल्या कानी येतील. प्रेमामध्ये मात्र व्यत्यय,अडकाठी येण्याचा संभव आहे. कर्मफल भाग्यकारक ठरेल.
मकर - दिवसाचं वेगळेपण असे काही म्हणण्यापेक्षा सण असलं तरी काबाडकष्ट चुकणार नाहीत असा दिवस आहे. मात्र अचानक धनलाभ होतील त्या दृष्टीने सकारात्मक रहा. दिवस संमिश्र आहे.
कुंभ - जोडीदाराचे म्हणणे ऐकून कार्य करावे लागेल. संसारामध्ये नवीन बेत आखले जातील. महत्त्वाची कामे अनेक दिवस राहिलेली सुरळीत होतील. दिवाळीचा आनंद जोडीदाराबरोबर द्विगुणीत होईल.
मीन - नको इतके कष्ट आणि मेहनत आज नको. तब्येतीच्या तक्रारी सुध्दा होतील. मानसिकता सांभाळून पुढे जावे. उपासनेच्या मार्गातून प्रगती होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.