Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य, मेषसह ५ राशींच्या लोकांसाठी महिन्याचा पहिला दिवस खास; तुमची रास?

Horoscope Today 1 May 2024: आजचे राशिभविष्य, १ मे २०२४: मेषसह ५ राशींच्या लोकांसाठी महिन्याचा पहिला दिवस खास; तुमची रास? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य.
Rashi Bhavishya Today 1 May 2024
Rashi Bhavishya Today 1 May 2024 Saam TV

दैनिक पंचांग - दिनांक १ मे २०२४

वार - बुधवार, मास - चैत्र, पक्ष - कृष्ण.

तिथी - अष्टमी (२९१०२) योग - शुभ.

करण - बालव, रास - मकर, नक्षत्र - श्रवण.

शुभाशुभ दिवस - उत्तम दिवस.

मेष : कामाचे चीज होणारच

आजचा दिवस आपल्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या चांगला ठरणार आहे. कामात केलेल्या कामाचे चीज होणारच. पण विशेष प्रोत्साहन मिळून प्रगतीच्या दिशेने वाटचाल आहे.

वृषभ: विशेष समाधान असेल

मनाप्रमाणे देवधर्म घडेल. प्रवासात काहीतरी त्रास झाला तरी मनासारखे काहीतरी साध्य झाले आहे, याचे विशेष समाधान असेल.

मिथुन: एकापेक्षा अनेक गोष्टी करणे टाळा

आपल्या स्वभाप्रमाणे उगाच एकापेक्षा अनेक गोष्टी करणे आज टाळा, नाहीतर उगाच एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होऊन उद्विग्नता वाट्यास येईल.

Rashi Bhavishya Today 1 May 2024
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

कर्क: मनासारख्या घटना घडतील

खरेतर खूप अपेक्षा न ठेवता समाधानी असणारी रास. पण आज मात्र जोडीदाराकडून प्रेमाने मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भागीदार समजून घेईल.

सिंह: आपल्याच धुंदीत राहाल

हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार असा आजचा दिवस. आपल्याच धुंदीत राहाल. त्यामुळे अकल्याण चितणाऱ्यांचे डोळे विस्फारले शिवाय राहणार नाही.

कन्या: थोडी धावपळ वाढेल

थोडी धावपळ वाढेल. अभ्यासावर, कला कुसर यावर विशेष लक्ष द्या. मनासारखे होण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील.

तुळ: घरी नव्या पाहुण्याची सरबराई राहील

घरी नव्या पाहुण्याची सरबराई राहील. सुखाच्या शोधात असणारी आपली रास. कुणी निंदा वा वंदा काम सुरू ठेवणार हे नक्की.

वृश्चिक: विजय आपला हे नक्की

बोलून गार शत्रू ठार असाच दिवस. मनात साचलेल्या गोष्टी सहजगत्या दुसऱ्याच्या गळी उतरवणार. विजय आपला हे नक्की.

धनू: कुठे साक्षीदार राहू नका

पैशांच्या बाबतीत सावध राहा. कुठे साक्षीदार राहू नका. आवक-जावक हाच आजचा अजेंडा आहे. म्हणा ना.

मकर: आनंदात भर पाडणारा दिवस

आनंदात भर पाडणारा दिवस. खरेतर खूप EXPress न करता शांतपणे दिवसाचा आनंद घ्याल. सरते शेवटी सौख्याचा समास लाभणार नक्की.

कुंभ: खर्चावर अंकुश ठेवा

विनाकारण चिंता, विचार यांनी मन सैरभैर राहील. म्हणून हे करणं टाळा. शिव उपासना मन स्थिर ठेवेल. खर्चावर अंकुश ठेवा.

मीन: इच्छांना सोनेरी पंख येतील

इच्छांना सोनेरी पंख येतील, जे सत्यात उतरतील. शेजारी सख्य राहील. मेजवानीचे योग आहेत.

Rashi Bhavishya Today 1 May 2024
Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com