त्वचा आणि केस निरोगी राहण्यासाठी 'असा' करा चिकुचा वापर

chikku
chikku

चिकू (Sapodilla) एक गोड फळ आहे . हे एक असे आहे जे वर्षभर उपलब्ध असते, आणि लोक ते मोठ्या आवडीने खात असतात. हे फळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेक आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी चिकू उपयोग केला जातो. चिकूमध्ये  बी, सी, ई जीवनसत्त्वे असतात तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, फायबर, खनिज आणि अँटी-ऑक्सिडंट भरपूर असतात. चिकूचा प्रत्येक भाग आरोग्यविषयक फायद्याने परिपूर्ण आहे.  त्याची पाने, मुळे आणि झाडाची साल औषध म्हणून वापरली जातात. हे चेहऱ्याबरोबरच  केसांचे सौंदर्य वाढविण्यात मदत करते. आपण चिकूचा वापर करून आपले केस सुंदर, चमकदार बनवू शकता. उन्हाळ्याच्या हंगामात चिकू त्वचेला अनेक समस्यांपासून वाचविण्यात मदत करतो.(Use Sapodilla to keep skin and hair healthy)

चिकू हे त्वचेसाठी (Skin) असाही फायदा 
उन्हाळ्यात घाम आणि उन्हामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चिकूमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर आहेत, जे त्वचेच्या काळजीसाठी खूप महत्वाचे आहेत. चिकूमध्ये अँटी-एजिंग एजंट देखील आढळतात, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त आहे. चिकूच्या वापराने उन्हामध्ये काळे पडणाऱ्या त्वचेला देखील फायदा होतो.

हे देखील पाहा

सुंदर  त्वचेसाठी असा कराल चिकूचा वापर
जर आपल्याला आपल्या त्वचेमुळे त्रास होत असेल तर चिकूने बनलेला फेस पॅक लावा. ते तयार करण्यासाठी 1/2 टीस्पून चिकू लगदा, 1/2 टीस्पून दूध आणि 1 टीस्पून हरभरा पीठ घ्या आणि सर्व मिसळा. नंतर ते आपल्या चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. या फेसपॅक मुळे काळपट असलेल्या त्वचेच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

केसांसाठी
जाड आणि चमकदार केस प्रत्येक मुलीचे आणि मुलाचे सौंदर्य वाढवतात. चिकूच्या बियांनी बनविलेले तेल केसांना लावल्यास केस मऊ आणि चमकदार बनू शकतात. एवढेच नव्हे तर केसामधील कोंडापासून मुक्त होण्यासही मदत होते .

सुंदर आणि जाड केसांसाठी असा करा चिकुचा वापर
जर तुम्हाला कमकुवत केसांच्या समस्येने त्रास होत असेल तर ,5 चमचे चिकूच्या तेलामध्ये अर्धा चमचे मिरपूड पावडर मिसळा आणि शिजवा. नंतर थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांवर किमान 40 मिनिटे लावा. मग केस धुवा. काही दिवस हे सतत वापरल्यास केस गळतीची समस्या दूर होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com