कोरोनावर प्रभावी कॅाकटेल, पाहा काय आहे हा प्रकार? ( व्हिडीओ ) 

covid19
covid19

मुंबई : सेंट्रल ड्रग्स स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशन Central Drugs Standards Control Organisation ने कोरोव्हायरस रोगाच्या उपचारांसाठी भारतात रोशच्या Roche अँटिबॉडी कॉकटेलच्या antibody cocktail आणीबाणी वापर प्राधिकृत Emergency Use Authorisation EUA कडून उपलब्ध करून दिले असल्याचे फार्मा जायंट रोश इंडिया Pharma giant Roche India यांनी बुधवारी जाहीर केले. रोश इंडियाच्या अँटीबॉडी कॉकटेल आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने Central Government परवानगी दिलेली आहे.

कोरोना चे सोम्या आणि मध्यम गंभीर रुग्णांना हे अँटीबॉडी कॉकटेल दिले जाणार आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक आणि बारा वर्षे वरील मुलांना याचा फायदा होणार आहे. रोश इंडियाच्या जागतिक स्तरावर हे उत्पादन करणार आहे. आणि देशातील सिप्ला लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारीत भारतात हे अँटीबॉडी कॉकटेल वितरित केले जाणार आहे. Roche antibody cocktail for treating Covid 19 gets emergency approval in india

अमेरिका America आणि युरोपातील Europe वापरासाठी दिलेल्या डेटा आणि औषध वापराच्या परवानगी नंतर केंद्र सरकारने या औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिलेली आहे. 


अँटीबॉडीज कॉकटेल म्हणजे काय ?
मोनोक्लोनल अँटिबॉडी Monoclonal antibodies प्रयोगशाळेद्वारे निर्मित प्रथिने Protein आहेत. जे रोगप्रतिकारक यंत्रणेच्या व्हायरससारख्या हानिकारक रोगजनकांशी लढा देण्याच्या क्षमता बाळगतात.  कोरोना वर प्रभावी ठरणाऱ्या दोन अँटीबॉडीज चे यात मिश्रण करण्यात आलेले आहे. कॅसिरिविमाब आणि इमदेवैमब Casirivimab and imdevimab हे मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज आहेत जे विशेषतः एसएआरएस-कोव्ही -2 SARS-Cov-2 च्या स्पाइक प्रोटीनविरूद्ध प्रभावी आहेत, म्हणजेच ज्या विषाणूमुळे कोविड -१९ होतो. हे अश्या प्रकारे डिजाईन करण्यात आले आहे कि, हे विषाणूची जोड तोडते आणि विषाणूला मानवी पेशींमध्ये Human Cells प्रवेश करण्यास रोखते.

तसेच ज्येष्ठ आणि बारा वर्षावरील मुलांसाठी हे कॉकटेल प्रभावी ठरणार असल्याचा असा दावा देखील कंपनीकडून केला जात आहे. सोम्य आणि मध्यम लक्षण असलेल्यांसाठी हे कॉकटेल फायदेशीर ठरेल असेही बोलले जात आहे.

Edited By- Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com