बुलढाणा जिल्ह्यातील 1420 गावांपैकी 138 गावात कोरोनाला 'नो एन्ट्री'

buldhana
buldhana

बुलढाणा : जिल्हयात कोरोनाने कहर केला असताना, बुलढाणा Buldhana जिल्हयात एक-दोन नव्हे तर तब्बल 138 गावे Villages अशी आहेत की, ज्या गावात अद्यापपर्यंत एकही कोरोना Corona रूग्ण Patient सापडला नाही. 'No entry' to Corona In 138 Out Of 1420 Villages In Buldhana District

असा दावा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असणारे जबाबदार अधिकारी राजेश लोखंडे यांनी  आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणें Rajendra Shingane यांनी नुकत्याच घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत राजेश लोखंडे यांनी हा दावा केला आहे. 

हे देखील पहा -

वाढती कोरोना पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली मृत्यूची संख्या पाहता, जिल्हयातील 138 गावे कोरोनामुक्त Corona Free असल्याचे सुख:द चित्र या बातमीमुळे पुढे आले आहे. आताच शासनाने राज्यातील 15 जिल्हे क्रोणाचे हॉटस्पॉट म्हणुन घोषित केले आहेत. त्या 15 जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. 'No entry' to Corona In 138 Out Of 1420 Villages In Buldhana District

संग्रामपुर Sangrampur तालुक्यातील जास्तगाव या गावाची लोकसंख्या 1 हजार आहे मात्र आजपर्यंत या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. दुदैवाने कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण आणि मृत्यूचे आकडे प्रसिध्द करण्याची चढाओढ लागलेल्या माध्यमांनी या सकारात्मक बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

आता यामुळे  बुलढाण्यातील या 138 गावांनी राबविलेल्या उपाययोजनांमुळे एकही कोरोनाबाधित रुग्ण गावात आढळून आला नाही. तेथील ग्रामस्थांनी क़ाय उपाययोजना राबविल्या त्याचा तातडीने अभ्यास करुण संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या जास्त असणाऱ्या गावात त्याच उपाययोजना राबवाव्यात जेणेकरून संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी मागणी Demand माजी मंत्री सुबोध सावजी Subodh Savji यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com