क्या आपके नमक मे प्लास्टिक है...  मिठामध्ये आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण 

क्या आपके नमक मे प्लास्टिक है...  मिठामध्ये आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण 

प्लास्टीकवर बंदी आणण्यात आली, पण हे प्लास्टीक काही आपली पाठ सोडायला तयार नाही. दरदिवशी तुम्ही प्लास्टीक खाताय, हे ऐकलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय... मिठामध्ये ‘मायक्रोप्लॅस्टिक’ म्हणजे प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं आढळलेत.  आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केलं. 

समुद्राच्या पाण्यात वाहून गेलेल्या प्लॅस्टिक कचऱ्यातून हे कण मिठामध्ये गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. 

संशोधनात विविध कंपन्यांच्या मिठाच्या नमुन्यात प्लास्टिकचे 626 सूक्ष्म कण आढळले. त्यात 63 टक्के प्लास्टिकचे कण होते, तर 37 टक्के प्लॅस्टिकचे तंतू होते.

मीठातल्या प्लास्टीकबाबतचं संशोधन केवळ भारतातच नाही, तर इतर देशातही झालंय. गेल्या चार वर्षांत झालेल्या चीन, अमेरिका, इंग्लंडमध्येही मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आणि तंतू आढळलेत.
दरदिवशी काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येत असल्यानं खायचं तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com