राजगडच्या पायथ्याला 200 जणांवर मधमाशांचा हल्ला; शिक्षक-विद्यार्थी अत्यवस्थ

राजगडच्या पायथ्याला 200 जणांवर मधमाशांचा हल्ला; शिक्षक-विद्यार्थी अत्यवस्थ

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांच्या उन्हाळी शिबिरासाठी १५१ विद्यार्थ्यांसह तब्बल २०० जण आले होते. शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणेच्या समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी वाहनातून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारच्या वेळाच्या झाडावरील आग्या मोहोळीतील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडीच्या स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. आणि जखमी विद्यार्थ्यांना मंदिरातून बाहेर काढत आपल्या खासगी वाहनातून रुग्णालयात तात्काळ दाखल केलं. 

मधमाशांचा हल्ला सुरु असताना शिक्षिका ज्योती कड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांना आपल्या कवेत घेत त्यांना वाचवलं. तब्बल ४५ मधमाशांनी शिक्षिका कड यांचा चावा घेतला. यात त्या गंभीर जखमी झाल्या.

स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळं विद्यार्थी, शिक्षकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही शिक्षकांची प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्यावरचा धोका टळलाय. 

WebTitle : marathi news honey bee attacked students came for study tour near rajgad 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com