मुंबई महापालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद 

मुंबई महापालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद 

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय ऑल फूड अँड लायसन्स होल्डर फाउंडेशननं घेतलाय. मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी औषध पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. त्याच्या निषेधार्थ मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना केला जाणारा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 

टेंडरचे सर्व नियम पाळूनही औषध पुरवठादारांना मुंबई महापालिकेनं ब्लॅक लिस्ट केल्याचा आरोप संघटनेनं केलाय. त्यामुळे तब्बल ४४ औषध पुरवठादार कंपन्यांनी महापालिका रुग्णालयांना औषधांचा पुरवठा थांबवलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या १७ मोठ्या रुग्णालयात तसंच, ३३ मॅटर्निटी आणि १७८ डिस्पेन्सरींमध्ये औषधं मिळणार नाहीत. औषध पुरवठा बंद झाल्यानं मलेरियावरचं टॉक्सिटायलीन, डेंगीवरचं सिप्क्झीन, याबरोबरच पॅरासिटिमॉल, रॅमेटिडीन, इकोस्प्रिन, मेकफॉर्मिन ही औषधं रुग्णांना मिळणार नाहीत. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत. 

औषध पुरवठादार आणि मुंबई महापालिका यांच्यातल्या वादाचा फटका रुग्णांना बसतोय. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केलीय. 

WebTitle : marathi news all food and licence holder foundation to stop all medicines supply to BMC hospitals


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com