व्यसनाधीनतेकडे मानसिक आजार म्हणून पाहावे...  (पहा व्हिडीओ)

saam video news
saam video news

मुंबई: जेव्हा आपल्यावरच एखाद्या मानसिक दडपण Mental Stress  वाढत जातं तेव्हा व्यक्ती नैराश्याच्या Depression बाजूने कलली जाते किंवा दुसऱ्या बाजूला व्यसनाधीनतेकडे वळते. नैराश्य आणि व्यसनाधीनता जर एकत्रित व्यक्तीस लागली तर त्याचे मानसिक आरोग्याचे लवकर खच्चीकरण होते. अशा परिस्थितीत रुग्ण म्हणून सामाजिक जबाबदारी ने कसे वागले पाहिजे सुधारणा कशा केल्या पाहिजेत यावर मनोविकार तज्ञ आनंद नाडकर्णी Anand Nadkarni यांनी उत्तर दिले आहे. सध्याच्या काळाला व्यसनाधीनता ही निश्चितपणे वाढीला लागते असे जगभरातील आकडे सांगतात. How to deal with addiction 

'व्यसनाधीन ते कडे आजार म्हणून पहावे, मानसिक त्रास म्हणून पहावे, त्याच्यावर व्यक्तीवर व्यसनी माणूस असा शिक्का लावला जाऊ नये. यावर काही शास्त्रीय मदत घेता येणे शक्य आहे. ती आपण घ्यावी व्यसनाधीनता कडे फक्त वाईट सवय म्हणून पाहू नये. तो एक मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आजार आहे म्हणून पहा आणि त्यावर योग्य ती शास्त्रीय मदत घ्या'. असे आनंद नाडकर्णी यांनी सांगितले आहे. 

आरोग्य क्षेत्रातील काम करणारे सेवक यामध्ये खूप भरडले जात आहेत. सर्व लोक आज तणावाखाली काम करतात. त्यांना यातून सुटका होण्यासाठी काही ना काही आहे. इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH या संस्थेच्या माध्यमातून 'दिलासा' Dilasa नावाची एक उपचार सेवा सुरू केली आहे. आरोग्य क्षेत्रातील सेवकांसाठी   हि सेवा असणार आहे. या गटामध्ये 100 हून अधिक व्यावसायिक सामाविष्ट आहेत ते या प्रोजेक्टचा भाग आहेत. सेवा आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे असेही त्यांनी साम टीव्ही शी बोलत असताना सांगितले. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com