अन्नदानामुळे लागला हरवलेल्या आईचा शोध...

Son Found MIssing mother in Food Donation Camp
Son Found MIssing mother in Food Donation Camp

पुणे - कोरोना Corona संसर्गाच्या काळात सामाजिक भावना जपत ठिकठिकाणी अन्नदान Food Donation सुरु आहे.  एकीकडे हे श्रेष्ठकाम सुरु असताना यामुळेच एका हरवलेल्या Missing आईचा Mother शोध लागल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून घरातून बेपत्ता झालेली आई सापडली, अर्थात हे सोशल मीडियामुळे घडू शकलं आहे. Missing Mother Found in Food Donation Camp 

हे देखील पहा -

सध्या कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे, त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना, गरजवंतांना समाजातील दानशूर लोकांकडून, सामाजिक संस्था Social Organisations संघटनांकडून मदत केली जातेय, पुण्यातही लहुजी तांडव फाउंडेशन तर्फे दर गुरुवारी फूटपाथ वर राहणाऱ्या लोकांना अन्नवाटप करण्यात येते.

अशाच एका गुरुवारी पुणे स्टेशनबाहेर Pune Railway Station केलेल्या अन्नवाटपाचे फोटो आणि व्हिडीओ संघटनेच्या अंतर्गत ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला. यातीलच एका कार्यकर्त्याने अन्न वाटप झालेल्या महिलेला ओळखले, आणि ओळखीच्या व्यक्तीची आई असल्याचे त्याच्या लक्षात आले.  Missing Mother Found in Food Donation Camp 

संगीता तूपसौंदर असे या हरवलेल्या महिलेचे  आहे. संगीता  या पुण्यातील औंध भागातील इंदिरानगर वसाहतीत राहतात, 5 महिन्यांपूर्वी मुलीचे निधन झाल्याने त्यांना  धक्का बसला आणि अशातच त्यांचे मानसिक संतुलन ही बिघडले, याच अवस्थेत गेल्या महिन्यात घरातून बाहेर पडलेल्या संगीता तुपसौंदर या दीडमहिना घरी परतल्याच नाही.

घरातल्या माणसांनी पोलीस तक्रार ही दाखल केली पाठपुरावा ही सुरु होता पण त्या सापडत नव्हत्या, अशातच अन्न वाटपाच्या फोटोमध्ये त्या दिसून आल्या. घरातल्या सदस्यांनी तत्काळ संबंधित संघटनेला कॉन्टॅक्ट करुन आईला सुखरूप घरी आणले. Missing Mother Found in Food Donation Camp 

कोरोना काळात हल्ली कोणाचीही खात्री देता येत नाही तिथे तब्बल दीड महिना घरापासून दुरावलेल्या आईचा शोध लागल्याने कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक मातृदिनाच्या दिवशी या हरवलेल्या आईचा शोध लागल्याने ही अनोखी घटना ठरली आहे. 

Edited By : Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com