VIDEO | तुम्ही गाढवांचा बाजार पाहिला का?

VIDEO | तुम्ही गाढवांचा बाजार पाहिला का?
Published On


गाढवंच गाढवं....  दुवान गाढवं... चौवान गाढवं...  गाडीत गाढवं... रस्त्यात गाढवं... मालकांसोबत कधी मित्रांसोबत... गाढवंच गाढवं... पांढरी गाढवं.. रंगीत गाढवं.... कुठून आली इतकी गाढवं? तर मंडळी हा गाढवांचाच बाजार आहे.. म्हणजे आपण गमतीनं म्हणतो तसा नाही, खराखुरा गाडवांचा बाजार आहे... जो खंडेरायाच्या जेजुरीत भरलाय... पौष पौर्णिमेच्या यात्रेत दरवर्षी भरणारा हा बाजार... 

तुम्हाला विश्वास बसणार नाही.. पण इथं कोट्यवधींची उलाढाल होतेय... गाढवांवरुन इथे भांडणंही सुरु झालीएत... आता तुम्ही म्हणाल हा काय गाढवपणा आहे, तर थांबा.. ही गाढवं तुमच्या साठी नसतील महत्वाची.. पण यांच्यासाठी त्यांचं महत्त्व मोठंय.... सात हजारांपासून 30 हजारांपर्यंतची बोली या गाढवांवर लावली जातीए.... काठेवाडी गाढवं तर 25 हजारांच्या पुढेच विकली जातात... 

औद्योगिकीकरणानं गाढवांचं महत्व कमी केलंय... नाहीतर या बाजाराची श्रीमंती काय होती.. हे जुन्या माणसांनी पाहिलंच असेल... बदललेल्या काळात आजही हा गाढवांचा बाजार भरतोय.. हे ही काही कमी नाहीए... 



WebTittle: Have you seen the donkey market?


 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com