राज्यातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषदांवर ६ जूनला फडकणार भगवा ध्वज

Chatrapati Shivaji Maharaj
Chatrapati Shivaji Maharaj

मुंबई : राज्य सरकारच्या Maharashtra ग्राम विकास Rural Development विभाग कडून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि कार्यालयात "शिवस्वराज्य दिन" Chatrapati Shivaji Maharaj साजरा करण्यात यावा यासाठी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. Government order for six June Shiv Rajyabhishek Din

या परिपत्रकानुसार राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद कार्यालयात ६जून ला "भगवा स्वराज्य ध्वज" उभारून "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्यात यावा असं सांगण्यात आलंय,त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात "भगवा स्वराज्य ध्वज" उभारून "शिवस्वराज्य दिन" साजरा केला जाणार आहे.

हे देखिल पहा

त्या साठी ग्राम विकास विभागाच्या वतीने भगवा स्वराज्य ध्वज संहिता ही सर्व कार्यालयांना जारी करण्यात आली आहे,या संहितेनुसार राज्यात पहिल्यांदा राज्यातील सर्व कार्यालयांवर भगवा ध्वज उभारून स्वराज्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे......Government order for six June Shiv Rajyabhishek Din

■ भगवा स्वराज्य ध्वज संहिता:-

◆ ध्वज उभारताना हा ध्वज उच्च प्रतीचा सॅटिन च्या कपड्याची भगवी जरी पताका असावी,
◆ या ध्वजाचा आकार ३फुट रुंद ६ फूट लांब असावा,
◆हा ध्वज जिरेटोप,सुवर्णहोन, जगदंब तलवार,शिवमुद्रा,वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभंचिन्हानी अलंकृत असावा, 

■ शिवशक राजदंड स्वराज्य गुढी संहिता:- 

◆ शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून १५ फूट उंचीची सुवर्ण आणि लाल कपड्याची राजदंड रुपी गुढी उभारावी, राजदंड सरळ उभा राहण्यासाठी त्याला किमान ५ ते ६ फुटाचा आधार द्यावा....

◆ राजदंड उभारताना सुवर्ण कलश,पुष्पहार, गाठी,आंब्याच्या डहाळी, अष्टगधं, अक्षदा,हळद,कुंकू,या साहित्याचा वापर करावा.....Government order for six June Shiv Rajyabhishek Din

■ ६ जून ला सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्यध्वज बांधून घ्यावा...शिवरायांनी सर्व प्रस्तापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याच्या सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमधे रिता करून रयतेची झोळी सुख,समृद्धी, सांगता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रित्या करणारा "सुवर्ण कलश" बांधावा...त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षदा लावाव्यात, त्या नंतर पुष्पहार, गाठी,आंब्याच्या डहाळी बांधावी.... शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभी करावी.... राष्ट्रगीत, महाराष्ट्र्गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करावी....सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी, असे ग्राम विकास विभागाच्या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com