छोटा राजनची पुतणी खंडणी प्रकरणात गजाआड

Priyadarshani Nikalje
Priyadarshani Nikalje
Published On

पुणे : गँगस्टर Gangster छोटा राजनची Chota Rajan पुतणी असल्याची सांगून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मागील वर्षभरापासून फरार असलेली छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36, रा. वानवडी)  हिला पुणे पोलिसांच्या Police खंडणी विरोधी पथकाने अटक केली. Chota Rajan Niece Arrested By Pune Police for Extortion

लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रियदर्शनी निकाळजे हिने मार्च 2020 मध्ये एका व्यक्तीला 50 लाख रुपयांची खंडणी Extortion मागितली होती. मी एका राजकिय पक्षाची जिल्हा अध्यक्ष आहे. तसेच, स्वतः गँगस्टर छोटा राजनची पुतणी असून, आमचा डीएनए देखील एक आहे, जीव प्यारा असेल तर 50 लाख रुपये दे असे म्हणत धमकावले होते. 

हे देखिल पहा

याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सापळा रचून 25 लाखांची खंडणी स्वीकारताना धीरज साबळे याला रंगेहात पकडले होते. Chota Rajan Niece Arrested By Pune Police for Extortion

गुड न्यूज - शेतकऱ्यांना अवजारे अनुदानावर मिळणार

तर चौकशीअंती मंदार वाईकर याला अटक केली होती. यातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी मात्र पसार झाली होती. दरम्यान खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सचिन अहिवळे यांना प्रियदर्शनी ही आज वानवडी परिसरात आली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिला सापळा रचून अटक केली.
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com