Breaking पुण्यातील सर्व माॅल, दुकाने सोमवारपासून उघडणार; सायं ७ पर्यंत परवानगी

Ajit Pawar
Ajit Pawar
Published On

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये अजून सूट देण्यात येणार आहे. नव्या निर्णयानुसार शहरातील हाॅटेल रात्री १० वाजेपर्यंत तर दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. आज पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. हे नवे निर्णय सोमवारपासून लागू होतील. More Relaxations In Pune from Monday From Corona Restrictions

आज सकाळी अजित पवार यांनी पोलिस मुख्यालयातील नव्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. 

पुण्यात ५ टक्क्यांपेक्षा पाॅझिटिव्हीटी रेट आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र जास्त बंधने ठेवण्यात आली आहेत तिथे ५.८ टक्के पाॅझिटिव्हीटी दर आहे, असे पवार यांनी सांगितले. सिनेमागृह नाट्यगृहे सुरु राहणार नाहीत. पुढील आठवड्याबाबत त्या बाबत निर्णय घेण्यात येईल. जर पाचच्या आत पाॅझिटिव्हीटी रेट राहिला तरच हे नवे नियम लागू होतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यातले माॅलही सोमवारपासून सुरु होणार आहेत.

हे देखिल पहा

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पायी आषाढी वारी निघणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. मात्र दहा मानाच्या पालखी सोहोळ्यांच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी उपस्थितीची अट काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले.More Relaxations In Pune from Monday From Corona Restrictions

आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत वारीबाबत चर्चा झाली. त्याबाबत पवार यांनी माहिती दिली. ''काल मंत्रीमंडळाची बैठक झाली. दहा महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी द्यायची. गेल्या वर्षी कोरोनाचं संकट होतं. त्यावेळी वारकऱ्यांना आवाहन केले होते. यावेळी देहु व आळंदी प्रस्थान सोहोळ्यासाठी १०० लोकांना व उरलेल्या आठ पालख्यांना ५० जणांना सहभागी होता येईल, असे पवार यांनी सांगितले. More Relaxations In Pune from Monday From Corona Restrictions

वारकरी पालखी घेऊन चालत जाणार नाहीत. यावेळी पालख्यांना प्रत्येकी दोन बसेस दिल्या जाणार आहेत. त्यातून पालख्या पंढरपूरकडे नेल्या जातील. प्रत्येक बसमध्ये कोरोना अटींचे पालन करुन प्रत्येकी ३० जणांना परवानगी असेल,'' असे अजित पवार यांनी सांगितले. पालख्या वाखरीला पोहोचल्यानंतर पंढरपूरपर्यंत प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी काढता येईल, असेही पवार यांनी सांगितले. 

पुणे कोरोना अपडेट : गुरूवार दि. १० जून,२०२१
◆ उपचार सुरु : ३,४५७
◆ नवे रुग्ण : २६१ (४,७३,३००)
◆ डिस्चार्ज : ३३३ (४,६१,३९६)
◆ चाचण्या : ५,७५३ (२५,६१,३३६)
◆ मृत्यू : १० (८,४४७)
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com