Kapil Sharma Trolled: ‘अरे किती चुका करतो?...’ म्हणत नेटकऱ्यांनी वाचल्या कपिलच्या अपयशाची यादी...

कॉमेडी स्टार कपिल शर्मा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Kapil Sharma Trolled
Kapil Sharma TrolledSaam Tv
Published On

Kapil Sharma Trolled: हिंदीमध्ये एक म्हण आहे, ‘जिसका काम उसी को साधे, कोई और करे तो डंका बाजे’. सध्या याच म्हणीचा वापर करत बॉलिवूडचा कॉमेडी स्टार कपिल शर्मा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. कपिल शर्माला आतापर्यंत आपण कॉमेडी करतानाच पाहिले आहे. कपिल शर्माचा ‘Zwigato’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करु शकलेला नाही.

याआधीही त्याने दोन चित्रपट केले. त्यातही तो बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यासाठी कुठे तरी अपयशी ठरला. पण कपिलने काही धडा घेतला नाही. त्याने तीच चूक आणखी पुन्हा एकदा केली आहे. पहिला चित्रपट 'किस किसको प्यार करू' हिट झाला असला तरी. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 42 कोटींची कमाई केली होती.

Kapil Sharma Trolled
Bad Bunny: रॅपरला गर्लफ्रेंडने शिकवली चांगलीच अद्दल, बनीवर ठोकला तीनशे कोटींचा दावा! काय आहे कारण?

दुसरीकडे, 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'फिरंगी' बॉक्स ऑफिसवर केवळ 9 कोटींची कमाई करू शकला. आता 'Zwigato' चीही तीच अवस्था आहे, तो एका आठवड्यात 1 कोटीही कमवू शकलेला नाही. अर्थात त्याचा अभिनय बहुधा कोणालाच आवडला नसावा असं बोललं तरी वावगं ठरंत नाही. कपिलची एकूण संपत्ती 300 कोटी आहे. त्याच्या नावाचा बोलबाला आजही बॉलिवूड इंडस्ट्रीत कायम आहे, चित्रपट सुपरहिट करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी त्याच्या शोचा वापर करतात.

Kapil Sharma Trolled
‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या टीमचं पाडव्याचं जंगी सेलिब्रेशन, ‘आडवा होईपर्यंत व्यायाम करून...’

कपिल शर्माचा ‘Zwigato’ चित्रपट तुम्ही पाहिला का ? त्यामध्ये तो करत असलेली क्रिया आणि आजुबाजुच्या परिसराचा कोणताही ताळमेळ या चित्रपटात होताना दिसत नाही. उदा- एकदा हसायला लागला की, हसतच राहतो. सोबतच गंभीर स्वरुपाची भूमिका देखील त्याला शोभत नाही. संमिश्र पद्धतीची साकारलेल्या पात्रांमध्ये तो सपशेल अपयशी ठरत असल्याचा दिसून येत आहे. त्याने चाहत्यांना चांगल्या पद्धतीने उत्तम कॉमेडी देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या संपूर्ण चित्रपटात ते सपशेल अपयशी ठरले.

टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. अनेक जणांचे उदाहरण डोळ्यासमोर असूनही कपिलने त्यांच्याकडून कोणताही धडा घेतला नाही. पाहिलं तर ज्या क्षेत्रातून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे, तेच क्षेत्र त्याने केलं तर आणखी प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. असे खूप कमी लोक आहेत जे मल्टी टास्कर्स बनू शकतात.

Kapil Sharma Trolled
Ketaki Chitale: केतकी चितळे पुणेकरांना काय-काय बोलली?; म्हणाली, तुम्हाला काहीच काय वाटत नाही...

कपिल शर्मा कदाचित कोणाला कॉपी करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असं अनेकदा नेटकऱ्यांनी त्याला सवाल केला. कदाचित तो सुनील ग्रोवरसारखा बनण्याचा प्रयत्न करत असेल. कारण त्याची कॉमेडी जितकी अप्रतिम आहे. तो तितकाच अप्रतिम अभिनयही करतो. अनेक मोठ्या स्टार्ससोबत त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे, प्रेक्षक त्याला दोन्हीही स्वरुपात पाहाण्यासाठी पसंदी दर्शवतात.

अनेकदा त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करत एक सल्ला दिला आहे, जर तू एका दगडावर पाय नाही ठेवलास तर आपटशील...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com