Yashraj Mukhate Wedding: ‘रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटे अडकला लग्नबंधनात; फोटो शेअर करत म्हणाला, ‘आज दोन मोठे कॉलेब्स झाले...’

Yashraj Mukhate: ‘रसोडे मैं कौन था’ फेम गायक आणि प्रसिद्ध संगीतकार यशराज मुखाटेने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे.
Yashraj Mukhate Wedding
Yashraj Mukhate WeddingInstagram

Yashraj Mukhate Wedding

‘रसोडे मैं कौन था’ या गाण्याला आपल्या खास शैलीमध्ये निर्मित केलेल्या यशराज मुखाटेची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते. यशराज मुखाते कायमच आपल्या क्रिएटिव्ह गाण्यांमुळे चर्चेत राहतो. कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारा यशराज सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलाय. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक यशराज मुखाटे काल (२८ फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकला आहे. त्याने ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे. (Singer)

Yashraj Mukhate Wedding
‘Article 370’च्या कमाईत घसरण; रिलीजच्या सहाव्या दिवशी केली फक्त ‘एवढी’ कमाई

यशराजने रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे. त्याच्या पत्नीचं नाव अल्पना आहे. यशराजने गेल्या काही तासांपूर्वी रजिस्टर मॅरेजचा फोटो शेअर केला. शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसतोय. (Song)

यशराजने लग्नाचा फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, "आज दोन मोठे collabs झाले आहेत. आज मी आणि अल्पनाने रजिस्टर मॅरेज केलं आहे. तर दुसरं collab बायोमध्ये आहे." यशराजचं दुसरं collab प्रसिद्ध गायक, संगीतकार अमित त्रिवेदीसोबत आहे.

अवघ्या काही तासांपूर्वीच यशराजचं नवं गाणं युट्यूबवर रिलीज झाले आहे. यशराज आणि अमित त्रिवेदीचं हे पहिलं गाणं असून नव्या गाण्याची जोरदार चर्चा होत आहे. हे गाणं जसलीन रॉयल, यशराज आणि अमित त्रिवेदीने गायलं आहे. हे गाणं अन्विता दत्तने लिहिलं आहे. (Social Media)

Yashraj Mukhate Wedding
शुभ मंगल सावधान! Pooja Sawant आणि Siddhesh Chavan अडकले विवाहबंधनात, लग्नानंतरचा पहिला VIDEO आला समोर

यशराज आणि गर्लफ्रेंड अल्पनाने रजिस्टर मॅरेज केले आहे. यशराजची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे आणि ती पेशाने कोण आहे, हे गुलदस्त्यात आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक यशराज मुखाटे कोरोना काळामध्ये सर्वाधिक प्रकाशझोतात आला होता. त्याने आपल्या क्रिएटिव्हिटीने नेटकऱ्यांच्या मनात घर केले आहे. संवादावरून मजेशीर गाणी बनवून त्याने इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवली. ‘रसोडे में कौन था?’, ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’, ‘सो ब्युटिफुल सो एलिगेंट’ सह अनेक मजेशीर गाणी त्याची जगभरात हिट झाली आहेत. (Entertainment News)

Yashraj Mukhate Wedding
Pushpa 2' New Update: अयो बाबो! अल्लू-अर्जुनच्या ‘पुष्पा २’ मधील एका सीनसाठी तब्बल ५० कोटींचा खर्च

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com