‘Article 370’च्या कमाईत घसरण; रिलीजच्या सहाव्या दिवशी केली फक्त ‘एवढी’ कमाई

Article 370 Box Office Collection: ‘आर्टिकल 370’ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद कायम मिळत असून प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा घसरला आहे.
Article 370 Day 6th Box Office Collection
Article 370 Day 6th Box Office CollectionSaam Digital

Article 370 Day 6th Box Office Collection

अभिनेत्री यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये २३ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. ‘आर्टिकल 370’ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद कायम मिळत असून प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा घसरला आहे. त्यासोबतच विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून इतकी खास कमाई करताना दिसत नाही.

Article 370 Day 6th Box Office Collection
शुभ मंगल सावधान! Pooja Sawant आणि Siddhesh Chavan अडकले विवाहबंधनात, लग्नानंतरचा पहिला VIDEO आला समोर

आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल 370’ चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे. तर चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत यामी गौतमसोबत (Yami Gautam) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियामणीही (Priya Mani Raj) आहे. तर विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आणि अर्जुन रामपालचा (Arjun Rampal) ॲक्शन थ्रिलर ‘क्रॅक’ चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

एकूण सहा दिवसात ‘आर्टिकल 370’ने ३० कोटींहून अधिक बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे, तर जगभरामध्ये चित्रपटाने ४५ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर ‘क्रॅक’ चित्रपटाने एकूण सहा दिवसांत फक्त ११.५ कोटींचीच कमाई केली आहे.

Article 370 Day 6th Box Office Collection
Pushpa 2' New Update: अयो बाबो! अल्लू-अर्जुनच्या ‘पुष्पा २’ मधील एका सीनसाठी तब्बल ५० कोटींचा खर्च

आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल 370’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.१२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.०८ कोटी, तिसऱ्या दिवशी १०.२५ कोटींची, चौथ्या दिवशी ३.६० कोटींची, पाचव्या दिवशी ३.३० कोटींच्या आसपास तर सहाव्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण सहा दिवसांत ३० कोटींहून अधिक बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दलचा आकडा ‘जियो स्टुडिओज’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कमाईचा आकडा शेअर करण्यात आलेला आहे.

२०१९ मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू- काश्मीरमधून 'कलम ३७०' हटवला होता. त्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. काश्मीरवरील परिस्थितीवर भाष्य करणारा हा दुसरा चित्रपट आहे. 'द काश्मीर फाईल्स' नंतर 'आर्टिकल ३७०' बद्दल प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

'आर्टिकल 370' हा चित्रपट घटनेतील कलम 370 हटवणे आणि काश्मीरमधील दहशतवाद या विषयावर आधारित आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी कोट्यवधींचा खर्च केलेला आहे. अरुण गोविल, यामी गौतम, प्रियामणी, किरण करमरकर यांच्यासह अनेक कलाकारांनी 'आर्टिकल 370' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Article 370 Day 6th Box Office Collection
Fighter Collection: हृतिक रोशनचा फायटर सुसाट, बॉक्स ऑफिससह जगभरात 360 कोटींचा गल्ला केला पार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com