Salman Khan: पुरस्कार मिळाला नाही म्हणून भर कार्यक्रमातून सलमानने घेतला काढता पाय; ३३ वर्षांनी केला ‘त्या’ किस्स्याचा उलगडा...

नुकतंच पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत सलमाननं ॲवॉर्ड शो मधील एक फार जुना किस्सा सांगितला आहे. त्या किस्स्याची सध्या बरीच चर्चा होत आहे.
Salman Khan
Salman KhanSaam Tv
Published On

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणामुळे चर्चेतच आहे. या वर्षात सलमान आपल्या आगामी बहूचर्चित चित्रपटांमुळे बराच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ या त्याच्या दोन्ही आगामी चित्रपटांनी प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातील गाण्यांनी आणि त्यातील सलमानच्या डान्सने त्याची चांगलीच चर्चा होत आहे. अशातच यंदाच्या ‘फिल्मफेअर २०२३’ या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सलमान खानकडे सोपवली आहे. नुकतंच सलमानने ‘फिल्मफेअर’च्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती.

नुकतंच पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत सलमाननं ॲवॉर्ड शो मधील एक फार जुना किस्सा सांगितला आहे, अनेक वर्षांपुर्वी त्याला बेस्ट ॲक्टरची ट्रॉफी मिळणार होती. पण असं झालं नाही आणि त्या कारणामुळे सलमानने ॲवॉर्ड शो मध्ये परफॉर्म करण्यास नकार दिला होता. 

Salman Khan
Urvashi Rautela Marriage Porposal: अरेच्चा... ऊर्वशीला थेट पाकिस्तानातून लग्नाची मागणी; ‘नवरी तयार असेल तर…’ म्हणत क्रिकेटरने दिली लग्नाची कबुली...

सलमानने यावेळी ९०च्या दशकातील एक किस्सा शेअर केला आहे. फिल्मफेअरसाठी त्याने एकदा स्टेजवर डान्स करण्यासाठी नकार दिला होता. त्या घटनेची माहिती देत सलमानने कार्यक्रमात खुलासा केला आहे. त्यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या एका आयोजकाने सलमान खानला स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी सांगितलं आणि सोबतच त्याला पुरस्कार मिळणार असल्याचंही सांगितलं.

१९९० मध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर सोहळ्यात सलमान खानला ‘मैंने प्यार किया’साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार होता, पण जेव्हा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जॅकी श्रॉफ यांना ‘परींदा’ या चित्रपटासाठी देण्यात येणार असल्याचं समजताच सलमान निराश झाला. याविषयी सलमान म्हणाला, “मला मॅनेजमेंटकडून सांगितलं गेलं होतं की, मला फिल्मफेअर ॲवॉर्ड शो मध्ये यायचं आहे आणि मला बेस्ट ॲक्टर पुरस्कारानं सम्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन सोहळ्यात पोहोचलो होतो. मला पुरस्कार मिळणार म्हणून माझ्या वडीलांनी छान सूट घातला होता. त्यानंतर नॉमिनेशन्स जाहीर झाले आणि बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार जॅकी श्रॉफला मिळाला. त्यावर वडील म्हणाले,हे काय आहे?”

नंतर पुढे सलमान म्हणतो, “त्या पुरस्कार सोहळ्याच्या रात्री मी परफॉर्म देखील करणार होतो, मी बॅकस्टेजला गेलो आणि मॅनेजमेंट आणि आयोजकांना सांगितलं की मी परफॉर्म करणार नाही. मला काही फरक नाही पडत याने.”

Salman Khan
Phakaat Teaser: भारतातले सिक्रेट्स पाकिस्तानला पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिक्रेट उलगडणार; 'फकाट'चा टीझर प्रदर्शित...

त्यानंतर सलमान म्हणतो, “सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जॅकीला मिळाला आहे, याचा मला आनंद आहे. त्याने 'परिंदा' चित्रपटामध्ये उत्तम काम केल्यामुळे त्याला तो पुरस्कार मिळाला आहे, पण तुम्ही लोकांनी माझ्यासोबत असं काम करायला नको हवं होतं. तुम्ही माझ्या वडीलांचे मित्र आहात मग तर तुम्ही माझ्याशी असं अजिबात वागायला नको हवं होतं. ”

त्यानंतर मला सांगितलं गेलं की, “मला परफॉर्म करावं लागेल. पण मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्यांनी मला परफॉर्मन्ससाठी पैसे देण्याची ही गोष्ट केली होती.” मी त्यांना तुम्ही किती पैसे द्याल असे देखील विचारले? तर त्यांनी मला यावर किंमत सांगितली.

Salman Khan
Parineeti -Raghav Engagement: राघव- परिणीती चोप्राचा साखरपुडा लवकरच? तारीख ठरली, या दिवशी...

त्यानंतर पुढे सलमान म्हणाला, “ते सांगत असलेल्या किंमतीवरही मी तयार होत नव्हतो, त्यांनी सांगितलेल्या किंमतीच्या पाच पट किंमत देण्याचे कबुल केल्यानंतर म्हटले, ‘प्लीज, कोणाला काही ही सांगू नको’ तर त्यावर मी म्हणालो तुम्ही हे चुकीच्या माणसाला सांगत आहेत. माझं हे उत्तर ऐकून ते जोरजोरात हसू लागले.”

माहितीसाठी इथं सांगतो की १९९० मध्ये जॅकी श्रॉफला 'परिंदा' सिनेमासाठी बेस्ट ॲक्टरचं फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळालं होतं. तेव्हा 'मैने प्यार किया' साठी सलमान खानचे नाव देखील चर्चेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com