Vivek Oberoi: 'सुशांत सिंगप्रमाणेच मी सुद्धा भोगलंय...' विवेक ऑबेरॉयने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू, म्हणाला; 'अनेकदा मला...'

मधली काही वर्षं बॉलिवूडपासून दूर गेलेल्या विवेकने पुन्हा चित्रपटसृष्टीत पाय रोवायला सुरूवात केली आहे.
Vivek Oberoi On Bollywood
Vivek Oberoi On Bollywood Saam Tv
Published On

Vivek Oberoi On Bollywood: कधीकाळी विवेक ऑबेरॉय हा बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जात होता. 'कंपनी', 'साथिया', 'शूट आऊट ऍट लोखंडवाला' अशा दमदार चित्रपटांमधून त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र विवेकच्या या यशस्वी कारकिर्दिला अचानक ब्रेक लागला. आणि बॉलिवूडमधून विवेक ऑबेरॉय हे नावचं जणू गायब झाले. विवेकच्या करिअरला ब्रेक लागण्याची अनेक कारणे सांगितली जातात. मात्र अलिकडेच स्वतः विवेक ऑबेरॉयने याबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे.

Vivek Oberoi On Bollywood
Stephen Boss: हॉलिवूड अभिनेता स्टीफन बॉसची आत्महत्या, हॉटेल रूममध्ये सापडला मृतदेह

एमएक्स प्लेअरच्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमधून बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा चर्चेत आला आहे. मधली काही वर्षं बॉलिवूडपासून दूर गेलेल्या विवेकने पुन्हा चित्रपटसृष्टीत पाय रोवायला सुरूवात केली आहे. बॉलिवूडमध्ये काही वादांमध्ये विवेक ऑबेरॉयचे नाव आले आणि त्यानंतर विवेकच्या यशस्वी कारकिर्दिला ब्रेक लागला. अलिकडेच एका मुलाखतीत याबद्दलचा स्वतः विवेकने खुलासा केला आहे. यामध्ये विवेकने सांगितले की, "माझ्याकडे दीड वर्ष कोणतेही काम नव्हते. मी ऑडिशन द्यायलाही वडिलांचे नाव न सांगता जायचो. यावेळी इतका निराश झालो होतो की अनेकदा आत्महत्या करुन सगळं संपवण्याचाही विचार मनात येवून गेला." (Actor)

याबद्दल बोलताना तो म्हणाला की, "मी माझ्या आसपास प्रचंड नकारात्मक गोष्टी पाहिल्या. कदाचित हा अजेंडा होता. मात्र हे अजेंडे कधी कधी तुम्हाला मानसिक रित्या उध्वस्त करतात. याचवेळी माझ्या आयुष्यात प्रियांका आली. तिच्यामुळेच मला मी कोण आहे हे समजले. आत्महत्येच्या विचाराबद्दल बोलताना विवेक ऑबेरॉय म्हणतो की, सगळं संपवण्याचा अर्थ खूप मोठा आहे. ज्यामुळे मी सुशांत सिंगने जे भोगलंय ते समजू शकतो. मी ती काळी बाजूही भोगली आहे जी तुम्हाला संपवू शकते. वारंवार सांगण्याने खोट्या गोष्टीही खऱ्या वाटू लागतात. आणि तुम्हीही तुमच्याबद्दल हेच सत्य आहे असं समजून जाता." (Bollywood)

याबद्दल पुढे बोलताना तो म्हणतो की "या सगळ्या नकारात्मकतेतून बाहेर काढण्यासाठी आईने मदत केली. मला माझ्या आईने अशा कॅंन्सर पिडीत मुलांची भेट घडवून दिली. जे लहानपणापासून प्रचंड दुःख सोसत आहेत परंतु तरीही ते आनंदी राहतात. यामुळेच मला धीर मिळाला." दरम्यान विवेक ऑबेरॉय सध्या ओटीटीवर झळकत आहे. अलिकडेच त्याने धारावी बॅंकमध्ये सुनील शेट्टीसोबत काम केले होते. या सीरीजमधील त्याच्या अभिनयाचे जोरदार कौतुक करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com