Vijayanand Trailer: प्रसिद्ध उद्याोजक विजय संकेश्वर यांचा जीवनावर येणार चित्रपट, ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला…

ऋषिका शर्मा दिग्दर्शित 'विजयानंद' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Vijayanand Trailer
Vijayanand TrailerSaam Tv

Vijayanand Trailer: ऋषिका शर्मा दिग्दर्शित 'विजयानंद' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला असून यूट्यूबवर ट्रेलरवर कमेंट करत चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद संकेश्वर यांनी केली असून अभिनेता निहाल राजपूत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Vijayanand Trailer
Alia Bhatta: स्वेट-टी-शर्ट वर आलियाचा कोझी मॉर्निंग लूक

हा चित्रपट कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका सत्यकथेवर प्रेरित आहे. ही कथा विजय संकेश्वर यांची आहे. चित्रपटात विजयने वडिलांचा वडिलोत्पार्जित व्यवसाय सोडून सामान ने- आण करण्याचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. विजयच्या वडिलांचा पुस्तकांचा व्यवसाय असतो. या दरम्यान त्याच्या वडिलांना खूप संघर्ष करावा लागतो आणि कठोर परिश्रमानंतर विजयानंद रोड लाइन्स (VRL) या लॉजिस्टिक कंपनीचा मालक होतो.

Vijayanand Trailer
Sonam Kapoor: सोनम कपूरने दाखवली 'वायू'ची झलक, सोशल मीडियावर व्हिडिओ चर्चेत

चित्रपटात विजयवर देशात सर्वाधिक व्यावसायिक वाहने ठेवण्याचा विक्रमही विजयच्या कंपनीच्या नावावर आहे. ते कन्नडमधील सर्वात मोठ्या वृत्तपत्राचा कर्नाटकमध्ये मालकही होते. मिळालेल्या माहितीनुसार, 2007 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाने त्याचे वृत्तपत्र विकत घेतले. त्यात विजयने 'पाच वर्षे कोणतेही वृत्तपत्र स्पर्धेत छापणार नाही.' अशी अटही ठेवली होती.

त्याच वेळी, 5 वर्षे पूर्ण झाल्यावर विजयने 'विजय वाणी' नावाचे दुसरे वृत्तपत्र काढले, जे नंतर पुन्हा कर्नाटकचे प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र म्हणून उदयास आले. विजयचे स्वतःचे टीव्ही चॅनलही आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी विजय संकेश्वर यांनी सांगितले की, या चित्रपटाची कथा त्यांची आणि त्यांचा मुलगा आनंद संकेश्वर यांची आहे, त्यामुळे चित्रपटाचे नाव 'विजयानंद' ठेवण्यात आले आहे.

हा चित्रपट पुढील महिन्यात ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com