Alia Bhatta: स्वेट-टी-शर्ट वर आलियाचा कोझी मॉर्निंग लूक

आलियाने इन्स्टाग्रामवर आई झाल्यानंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत आलिया फारच सुंदर दिसत आहे.
Alia Bhatta Winter Look
Alia Bhatta Winter LookInstagram/ @aliaabhatt
Published On

Alia Bhatta: सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बरेच चर्चेत आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न झाले होते.सध्या ते दोघेही आपल्या मुलीसोबत आहेत. आलियाने इन्स्टाग्रामवर आई झाल्यानंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत आलिया फारच सुंदर दिसत आहे.

Alia Bhatta Winter Look
Bigg Boss Marathi 4: किरण मानेला मिळणार का बिग बॉसच्या घरात एन्ट्री? पाहा व्हिडिओ

आलियाने नुकताच शेअर केलेल्या या फोटोमध्ये पांढरा आणि काळ्या रंगाचे स्वेटर घातलेले दिसत आहे. ती फोटोत थोडी थकलेली दिसत असून तिने हा फोटो उन्हात बसून काढलेला दिसत आहे. या फोटोत आलियाने केस मोकळे ठेवलेले दिसत आहेत. हा सुंदर फोटो शेअर करत तिने चहाच्या इमोजीसोबत 'कोझी' असे लिहिले आहे. म्हणजेच ती उन्हात विश्रांती घेत आहे.

Alia Bhatta Winter Look
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: बबितावर आले संकट, जर्मनीमध्ये झाली मोठी दुखापत

आलियाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक करत कमेंटचा वर्षाव केला आहे. सोबतच आलियाची आई सोनी राजदानने ही आपल्या लेकीच्या फोटोवर कमेंट केली आहे. चित्रपट समीक्षक भावना सौम्याने कमेंटमध्ये लिहिले, "तु ठिक आहेस का बेब्स? तुला आशीर्वाद कायम आहे." आलियाची मैत्रिण यास्मिन कराचीवाल हिनेही फोटोवर कमेंट केली आहे.

याशिवाय आलिया भट्टच्या चाहत्यांनी कमेंट करून पुन्हा तिला मुलीचा फोटो शेअर करण्याची मागणी केली. सोबतच काही चाहत्यांनी आलियाला कमेंट करत विचारले की, आम्हाला बाळाचा फोटो पाहण्याची आणि बाळाचे नाव जाणून घेण्याची फार इच्छा आहे. आलियाने नुकताच शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.

Alia Bhatta Winter Look
Jason David Frank: सर्वांच्या लाडक्या 'पॉवर रेंजर' फेम अभिनेत्यानं संपवलं जीवन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आलियाने काही दिवसांपू्र्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एका चित्रपटाची घोषणा केली आहे. त्या चित्रपटाचे नाव 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' असून येत्या आगामी वर्षात एप्रिल महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com