Urfi Javed Fashion: उर्फीची नवी स्टाईल पाहून म्हणाल, केवड्याच्या बनात नागीन सळसळली!

उर्फीने आता तर चक्क अंगावर गुडांळला साप, चकाकणारा ड्रेस पाहून नेटकरी थक्क
Urfi Javed Fashion
Urfi Javed FashionInstagram @

Urfi javed Look: फॅशननिस्टा उर्फी जावेद सध्या ऐकायचं काय नाव घेत नाही आहे. नेहमीच हटके स्टाईलने चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या उर्फीच्या नव्या लूकने साऱ्यांनाच घाम फोडायला लावला आहे. उर्फीने चक्क अंगावर रंगीबेरंगी चमक असलेल्या सापाचा डिझाईन असलेला ड्रेस परिधान केला आहे. उर्फीची ही अतरंगी स्टाईल पाहून सारेच थक्क झाले आहे. सोशल मीडियावर उर्फीचा नवा लूक तुफान व्हायरल होत आहे.

Urfi Javed Fashion
Rocky Aur Rani Ki Prem Kahani च्या सेटवरील 'तो' व्हिडीओ व्हायरल, आलियाच्या लूकने वेधले लक्ष

उर्फी जावेदने बोल्ड स्टाईलने केवळ अंगावर साप गुंडाळला आहे. उर्फीने स्नेक स्टाईल टॉप आणि स्टायलिश स्कर्ट परिधान केला आहे. याआधी देखील उर्फी तिच्या स्टायलिश अदांजाने चर्चेत राहिली आहे मात्र आता उर्फीने हद्दच पार केली.

Urfi Javed Fashion
Onkar Bhojane: 'हास्यजत्रा सोडून मी आनंदीत...'ज्यामुळं करिअर घडलं त्यावरच ओंकार थेट बोलला

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने नुकतेच एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिची झलक दाखवली. उर्फी चक्क गुडांळलेला नवा सापाचा लूक करून आली आहे.यासह उर्फीने केसांची बनस्टाईल केली आहे.उर्फीने उपस्थितांसह साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उर्फीच्या नव्या लूकवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. उर्फी जावेदच्या बोल्ड लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेद टीव्ही शोने आपल्या विचित्र फॅशनने फार कमी वेळात लोकप्रियता मिळवली आहे. कधी कधी उर्फी जावेद रेस्टॉरंट्सच्या ओपनिंगमध्ये किंवा छोट्या इव्हेंटमध्ये शो ऑफ करत असे, परंतु आता उर्फी मोठ्या डिझायनर्सच्या पोशाखात तिची ऑफबीट फॅशन दाखवताना दिसत आहे.उर्फी जावेदने प्रत्येक वेळी स्वतःच्या फॅशन सेन्सला हरवून एक नवीन ड्रेस शोधला. कधी फुलांनी बनवलेले ड्रेस तर कधी कपडे सुकवणारे चिमटे घालून उर्फी लोकांना चकित करत असते.

Edited By- Manasvi Choudhary

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com