
Tuzi majhi jodi Jamali Drama: मराठी रसिकांचे जितके प्रेम चित्रपटांवर आहे त्याहून अधिक प्रेम कदाचित ते नाटकावर करतात. अनेक कलाकारांनी देखील हे त्यांना नाटकात काम कार्य;ला जास्त आवडते हे मान्य केले आहे. रसिकांच्या प्रेमामुळेच कलाकारांना देखील काम करण्याचा हुरूप येतो. त्यामुळे नवनवीन नाटकं रंगभूमीवर येत आहेत. असेच एक नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तमाशात सोंगाड्या म्हणून काम करणाऱ्या दोन व्यक्तींचा व्यावसायिक नाटक ते चित्रपटामधील अभिनेता होण्याचा प्रवास 'तुझी माझी जोडी जमली' या नाटकात पाहायला मिळणार आहे. आनंद म्हसवेकर लिखित दिग्दर्शित या नाटकात प्रणव रावराणे, मुकेश जाधव, अमृता रावराणे, निखिला इनामदार अशी उत्तम कलाकार आहेत.
जिव्हाळा या संस्थेने नाटकाची निर्मिती केली आहे. तर शांभवी आर्टसने हे नाटक प्रकाशित केले आहे. नाटकाचं संगीत सुखदा भावे-दाबके यांनी तर नेपथ्य अनिश विनय यांनी केले आहे. गोट्या सावंत सूत्रधार आहेत.
प्रणव रावराणे आणि मुकेश जाधव यांनी नाटकं आणि चित्रपटात अभिनेता होण्याचा प्रवास, त्यांच्या काही अडचणी आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमाकडे फिरवलेली पाठ यावर आधारित हे नाटक आहे. या सर्व प्रशांची उत्तरं प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांना हसवत मार्मिक पद्धतीने या नाटकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमृता रावराणे, निखिला इनामदार यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे.
मराठी रंगभूमीवर आनंद म्हसवेकर हे महत्त्वाचं नाव आहे. यु टर्नसह अनेक आशयसंपन्न नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. म्हसवेकर यांच्या नाटकांच्या मांदियाळीत आता "तुझी माझी जोडी जमली" या नाटकाचीही भर पडत आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींना कसदार नाट्यकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.