

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सामंथा रुथ प्रभू एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सामंथा नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहायला मिळत असते. सामंथा प्रभूचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्याचबरोबर सामंथाने तिच्या दमदार अभिनयाचे वेड सर्व चाहत्यांना लावले आहे. अभिनेत्री सामंथा तिच्या सुंदर सौंदर्यामुळे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री सामंथाने तेलगू आणि बॅलिवूड इंस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामंथा प्रभूचा सोशल मिडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. याबरोबर अभिनेत्री चाहत्यांसाठी नेहमीच नवनवीन पोस्ट शेअर करत असते. आज सामंथाच्या दमदार कामगिरीमुळे ती किती कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे, हे जाणून घेऊया.
तेलगू चित्रपटातील ही स्टार कलाकार एका चित्रपटासाठी ३ ते ५ कोटी रुपये घेते. याबरोबर अभिनेत्रीचे 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंतवा' गाणे खूप सुपरहिट ठरले होते. सामंथाने त्या गाण्यासाठी ५ कोटी रुपये मानधन घेतले होते. त्याचबरोबर अभिनेत्रीची व्यवसाय, रिअल इस्टेट आणि इतर गोष्टींमध्ये देखील गुंतवणूक आहे. सामंथा एका ब्रँड एंडोर्समेंटमधून ८ कोटी रुपये कमवते. अभिनेत्री सामंथा फॅशन,ब्यूटी प्रोडक्स, इलेक्ट्रॅनिक्स आणि हेल्थ फूड्स यांसारख्या ब्रँडमधून पैसे कमवत असते. अभिनेत्री सामंथाचे डुप्लेक्समध्ये अलिशान असे अपार्टमेंट आहे. या अलिशान अपार्टमेंटची किंमत सुमारे ७.८ कोटी रुपये आहे. याबरोबर अभिनेत्रीचे समुद्रसपाटीजवळ ३ बीएचके घर आहे. या घराची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. सामंथाची रिअल इस्टेटमध्ये ९.३४ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
सामंथा रुथ प्रभू तिच्या चाहत्यांची एक रोल मॅाडेल आहे. अभिनेत्रीला लक्झरी वस्तू आणि महागड्या कारची खूप आवड आहे. याबरोबर तिच्याकडे या सर्व गोष्टींचे भव्य कलेक्शन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q7 आहे, ज्याची किंमत ८९.९० लाख रुपये आहे. याबरोबर सामंथाकडे पोर्श केमन जीटीएस, लँड रोव्हर, मर्सिडीझ बेंझ G63 AMG आहे. सामंथाच्या पोर्श केमन जीटीएसची किंमत १.४६ कोटी रुपये आहे, याबरोबर लँड रोव्हरची किंमत सुमारे २.२६ कोटी रुपये आहे. अभिनेत्रीच्या मर्सिडीझ बेंझ G63 AMG ची किंमत सुमारे २.५५ कोटी रुपये आहे. याबरोबर सामंथाकडे बीएम डब्लू 7 ज्याची किंमत सुमारे १.४२ कोटी रुपये आहे, आणि जग्वार XF ज्याची किंमत ७६ लाख रुपये आहे. तेलगू चित्रपटातील ही प्रसिद्ध अभिनेत्री १०१ कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे.