Dilip Joshi On Weight Loss: रोल मिळवण्यासाठी जेठालालने केलं स्ट्रगल, दिड महिन्यातंच केलं इतकं वजन कमी...

जेठालालने अर्थात दिलीप जोशीने त्याच्या भूमिकेसाठी थेट वजन कमी केल्याची सध्या चर्चा होत आहे. नुकतंच त्याने एका मुलाखतीत चित्रपटातील भूमिकेसाठी वजन कसे कमी केले, याबद्दल एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे.
Dilip Joshi On Weight Loss
Dilip Joshi On Weight LossSaam Tv

Dilip Joshi On Weight Loss: गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा’ या मालिकेची नेहमीच सोशल मीडियावर तुफान चर्चा होते. सध्या या मालिकेत अनेक वेगवेगळे ट्वीस्ट अनुभवायला मिळत आहेत. मालिकेतील प्रमुख पात्र म्हणजे, जेठालाल. नेहमीच आपल्या विशिष्ट स्टाईलने, कपड्यांमुळे आणि बोलण्याच्या स्टाईलमुळे सर्वांनाच त्याने आपलंसं केलंय. नुकतंच तो पुन्हा एकदा त्याच्या वजनामुळे चर्चेत आला. जेठालालने अर्थात दिलीप जोशीने त्याच्या भूमिकेसाठी थेट वजन कमी केल्याची सध्या चर्चा होत आहे. नुकतंच त्याने एका मुलाखतीत चित्रपटातील भूमिकेसाठी वजन कसे कमी केले, याबद्दल एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे.

Dilip Joshi On Weight Loss
Shraddha Kapoor Talk In Marathi: ‘काय कसं काय सर्व ठिक ना?...’ म्हणत श्रद्धाने केली पापाराझींची विचारपूस; अभिनेत्रीचा Video व्हायरल...

दिलीप जोशीबद्दल बोलायचे तर, त्याने फक्त मालिकेतच नाही तर चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारली. नुकतंच त्याने मॅशेबल इंडिया या इंग्रजी संकेतस्थळाला मुलाखत दिली, त्या मुलाखतीत दिलीपने चित्रपटातील भूमिकेसाठी वजन कमी (Weight Loss) कसे केले, याबद्दल एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे.

किस्सा शेअर करताना तो म्हणतो, “मी १९९२ मध्ये एक गुजराती चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचं नाव ‘हू हूंशी हुंशीलाल’ असं होतं. त्या चित्रपटात जवळपास 35-36 गाणी होती. तो चित्रपट राजकारणावर व्यंगात्मक भाष्य करणारा चित्रपट होता. त्यातील भूमिकेसाठी मला जवळपास माझे १६ किलो वजन कमी करावं लागलं होतं.”  (Latest Entertainment News)

Dilip Joshi On Weight Loss
Amitabh Bachchan Reaction On Bike Ride: बिग बींनी अखेर हेल्मेट न घालण्याच सांगितलं कारण; म्हणाले...

सोबतच पुढे दिलीप जोशीने सांगितले, “मी ज्याठिकाणी काम करत होतो तिथून घरी पायी जायचो. याशिवाय मी स्विमिंगही करत होतो. याचा फायदा मला त्या भूमिकेसाठी झाला. त्यावेळी मी माझी स्कूटर उभी करायचो आणि मग स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलल्यानंतर मरीन ड्राईव्हवरील ओबेरॉय हॉटेलपर्यंत पावसात जॉगिंग करत जायचो. मी एक तासाच्या आसपास व्यायाम करत होतो. अशा प्रकारे मी दीड महिन्यात माझे १६ किलो वजन कमी केले. चित्रपटात दिलीप जोशीसोबत रेणूका शहाणे,मनोज जोशी, मोहन गोखले यांच्या प्रमुख भूमिका होत्या.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com