Bigg Boss 16 : सलमान खानच्या शोमध्ये ग्लॅमरचा तडका, मिस इंडिया रनर अपची एन्ट्री

फेमिना मिस इंडिया २०२० ची उपविजेती या बिग बॉसच्या सीझनमध्ये एक स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश करणार आहे.
Manya Singh
Manya SinghSaam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या 'बिग बॉस'चा(Bigg Boss) आगामी सीझन १ ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. मात्र, या शोच्या ऑन एअर होण्याआधीच त्यातील स्पर्धकांची बरीच चर्चा होत आहे. यावेळेस कोण या शोमध्ये सामील होणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना लागली आहे. या दरम्यान, बोलले जात आहे की फेमिना मिस इंडिया २०२० ची उपविजेती मन्या सिंग(manya singh) यावेळी एक स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश करणार आहे.

Manya Singh
Raju Srivastav : 'हमे तुमसे प्यार कितना', राजू श्रीवास्तव यांचा कुटुंबासोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मन्या सिंग ही शोची पहिली कन्फर्म केलेली स्पर्धक आहे. मन्याच्या प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी तिच्या एन्ट्रीबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Manya Singh
Koffee With Karan:आर्यन खानच्या अटकेबाबत गौरी खान पहिल्यांदाच इतकी स्पष्ट बोलली; म्हणाली, तो काळ...

प्रेक्षकांना बिग बॉस हा शो खूप आवडतो. सलमान खान बऱ्याच सीझनपासून हा शो होस्ट करत आहे. या शोमध्ये देशातील आणि जगातील अनेक प्रसिद्ध स्टार्स सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस'ने प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सना जवळून जाणून घेण्याची संधी दिली आहे. असे सांगितले जात आहे की 'बिग बॉस १६' मागील सर्व सीझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे. या शोचा प्रीमियर एपिसोड दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्याचा दुसरा भाग २ ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. यासोबतच 'बिग बॉस १६' च्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमान खानसोबत शहनाज गिल दिसणार असल्याची चर्चा आहे. साहजिकच त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

शोमध्ये कनिका मान, पूनम पांडे, जन्नत जुबेर, फैजल शेख, राज कुंद्रा, शिवीन नारंग, फहमान खान आणि मुनावर फारुकी या स्पर्धकांसोबत लोकसभा सदस्य आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँच्या नावाचीही चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com