थरार आग्रा भेटीचा; डॉ.अमोल कोल्हे पुन्हा साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

डॉ.अमोल कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Shivpratap Garudjhep
Shivpratap GarudjhepSaam TV
Published On

मुंबई : सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्यासमोर आले आहेत. प्रेक्षक ऐतिहासिक चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद देत आहेत. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये नेहमीच 'छत्रपती शिवाजी महाराजांची' भूमिका लिलया पार पाडणारे डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप'(Shivpratap Garudjhep) हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य सत्तेचा पोलादी पहारा भेदत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेचा प्रसंग आता 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटातून भव्य दिव्य रुपात अनुभवता येणार आहे.

Shivpratap Garudjhep
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कमी होईनात!, नव्याने समन्स बजावला

अभिनेता अमोल कोल्हेने 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाच्या टीझरने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहेत. या पोस्टला "हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्याचे हात मुळासकट उखडून टाकण्याची धमक आम्ही बाळगतो..! सह्याद्रीच्या नरसिंहाची शिवगर्जना" अशी खास टॅगलाईन देत हा टीझर शेअर केला आहे. येत्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून टीझरसोबत पोस्टरही अमोल कोल्हेने शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Shivpratap Garudjhep
Anil Kapoor : ना व्यायाम, ना कुठलं स्पेशल डाएट; अनिल कपूरने उलगडले फिटनेसचे रहस्य!

'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवातीला औरंगजेब उत्तरेत मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करत 'तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा' असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हेची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दमदार एंट्री होते. 'यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उघडून देण्याची धमक आम्ही बाळगतो'. हा त्याचा डायलॉग अंगावर अक्षरशः काटा आणतो. अवघ्या १ मिनिटाच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. प्रेक्षक ट्रेलरसोबतच चित्रपटासाठी कमालीचे उत्सुक दिसत आहेत. सध्या चित्रपटातील बरेच पात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे अन्य पात्रांची चर्चा चांगलीच रंगत आहे.

'शिवछत्रपती' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटले की, डॉ. अमोल कोल्हे याचचं नाव प्रेक्षकांच्या ओठांवर येत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com