Kala Chashma Song : १५ वर्षाच्या मुलाने लिहीलं होतं 'काला चश्मा' गाणं, आज आहे पंजाब पोलिसात हेड कॉन्स्टेबल

'काला चश्मा' या गाण्याच्या लेखकाचे या गाण्यामुळे तब्बल १५ वर्षानंतर नशिब पलटले आहेत.
Kala Chashma
Kala ChashmaSaam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडमधील चित्रपटांची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. अशी असंख्य गाणी आहेत ज्या गाण्यांवर प्रेक्षक आनंद लुटत नाचतात. अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'बार बार देखो'(Baar Baar Dekho) या चित्रपटातील 'काला चश्मा' गाण्यांवर प्रेक्षकांसोबत अनेक बडे कलाकारही थिरकले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या गाण्याच्या लेखकाचे या गाण्यामुळे तब्बल १५ वर्षानंतर नशिब बदलले आहेत.

Kala Chashma
Kareena Kapoor khan : सैफच्या आधी करीना कपूरच्या हृदयात कोण? 'हा' नेता आहे करीनाचा क्रश

तुम्हाला माहिती आहे का? या गाण्याचे मुळ लेखक कोण आहेत? अनेक रियालिटी शोमध्ये या गाण्यावर प्रेक्षक भरपूर थिरकले, सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक रील व्हिडीओ आपण रोज पाहत असतो. 'काला चश्मा' हे गाण ९०च्या दशकातील मूळ पंजाबी गाण आहे. ज्याने गाणे लिहिले त्यांचे नाव अमरिक सिंह शेरा असे आहे. जेव्हा त्याने गाणे लिहीले त्यावेळी अमरिक अवघ्या १५ वर्षांचा असून इयत्ता ९वीत शिकत होता. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार,अमरिक सिंह शेरा सध्या पंजाबमधील कपूरथला येथे पंजाब पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे.

Kala Chashma
Bigg Boss 16 : 'या' सुपरस्टारचा भाऊ सलमान खानच्या शोमध्ये करणार का एन्ट्री? सोशल मीडियावर केला खुलासा

अमरिक सिंह शेराने हे गाणे १९९० मध्ये लिहिले होते. अमरिकने १९९० मध्ये लिहीलेले गाणे १५ वर्षांनंतर एका चित्रपटात झळकेल याची अमरीकला कल्पना देखील नव्हती. २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अमरिकने सांगितले, '२ महिन्यांपूर्वी, मला माझ्या मित्राचा फोन आला तो म्हणाला तुझे 'काला चश्मा' हे गाण टिव्हीवर दाखवत आहेत. मलाच माहितीच नव्हत की हे गाणे कसे काय दाखवत आहेत. पण मी माझं गाण टीव्हीवर आलं म्हणून खूप आनंदात होतो. परंतु मी जेवढा आनंदात होतो तेवढाच चिंतेतही होतो.'

मीडिया रिपोर्टनुसार, अमरिक सिंह शेराने काही कागदपत्रांवर सही केल्यानंतर त्याला गाण्यासाठी फक्त ११,००० रु. इतकी रोकड मिळाली. अमरीकचा असा दावा आहे की, जालंधर मधील एका गाणे रेकॉर्ड करणाऱ्या कंपनीने अन्य काही गाण्यांसाठी अमरीकला संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी अमरीकला सांगितले की, मुंबईमधील स्थित एका सिमेंट कंपनीच्या उद्घाटनासाठी तुमच्या गाण्याची गरज आहे. सिमेंट कंपनीचे नावही अमरीकला ठाऊक नव्हते आणि चित्रपटात गाणे येणार हे सुद्धा त्याला माहित नव्हते. यावर निराशा व्यक्त करत अमरीक म्हणाला, 'चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च किंवा स्क्रिनिंगच्या वेळी मला फिल्म इंडस्ट्रीतील कोणीही मुंबईत बोलावले नाही. मला तिथे जाऊन सर्वांना सांगायचे होते की पंजाबमधील एका छोट्या गावातल्या माणसाने हे गाणे लिहिले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com