Kaun Banega Karodpati: 'कौन बनेगा करोडपती' च्या इतिहासात अभूतपूर्व स्पर्धक, ठिकाणाबद्दल वाचून व्हाल अवाक

सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या बुद्धीला आणि ज्ञानाला चालना मिळत असते.
Kaun Banega Crorepati
Kaun Banega Crorepati Saam Tv
Published On

मुंबई: काही दिवासांपासून बिग बी अमिताभ बच्चन खूपच चर्चेत आहेत. सध्या ते प्रेक्षकांच्या भेटीला 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून येत आहे. त्या कार्यक्रमाचा सध्या चौदावा सिझन प्रसारित होत आहे. हा शो छोट्या पडद्यावरुन प्रसारित होत असला तरी प्रेक्षकांचे मनोरंजनासोबतच ज्ञानाला वाव मिळत आहे.

सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या बुद्धीला आणि ज्ञानाला चालना मिळत असते. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे असून बिग बींमुळे तो कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे.

Kaun Banega Crorepati
Bollywood Movie Box Office Collection: अक्षयचा 'राम सेतू' पुन्हा फ्लॉप?, अजयच्या 'थँक गॉड'ची कोटीच्या कोटी उड्डाणे

'कौन बनेगा करोडपती'च्या इतिहासात पहिल्यांदाच एक घटना घडली आहे, नुकताच त्याचा सोशल मीडियावर प्रोमो शेअर करण्यात आला असून त्याची बरीच चर्चा होत आहे. यावेळी बिग बींच्यासमोरील हॉट सीटवर डॉ. समित सेन नावाचा स्पर्धक बसला होता.

हा स्पर्धक दिल्लीतील राम मनोहर लोहिया महाविद्यालयातील असून मायक्रोबायोलॉजी विषयात मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करतोय. त्याचे सध्या शिक्षण २८ वर्ष इतके आहे. एक मुख्या बाब म्हणजे, डॉ. समित सेन अंदमान- निकोबार येथून आला आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या गेल्या २२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच येणारा हा स्पर्धक आहे.

Kaun Banega Crorepati
Bigg Boss Marathi Season 4: बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीसांची एन्ट्री; 'या' दोन स्पर्धकांनी विचारले खास प्रश्न, दिले सडेतोड उत्तर

सोनी टेलिव्हिजनकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये डॉ. समित सेनसोबत बिग बी गप्पा मारताना म्हणतात, "तुम्ही अंदमान- निकोबार बेटांचे प्रतिनिधीत्व करणारे पहिले स्पर्धक आहात." असे म्हणत त्यांचा सत्कार समारंभ केला.

तुम्हाला अंदमान निकोबार बद्दल काय वाटतं? हा प्रश्न जेव्हा बिग बींनी विचारला तेव्हा समित सेन म्हणतो, " माझ्या साठी ही गौरवाची बाब आहे. पोर्टब्लेअर ला तुमचा 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. मी लहान असताना तुम्ही आमच्या परिसरात भेट दिल्याची अफवा ऐकली होती." या वाक्यावर बिग बी स्मितहास्य देत बोलतात, "हो एकदा मी तुमच्या इथे आलो होतो."

Kaun Banega Crorepati
Pratahmesh Parab: प्राजू्च्या प्रेमासाठी वेड्या झालेल्या दगडूला रियल लाईफमध्ये मिळाली प्राजू?, चर्चेला उधाण

त्यावेळी समित पुढे म्हणतो की, "मला अंदमान निकोबारबद्दल माहित आहे, कारण माझा जन्म तेथीलच आहे. 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रम प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय टेलिव्हिजनवर बेटाचे प्रतिनिधीत्व करायला मिळत आहे, याचा मला अभिमान आहे. हा खेळ खेळणे माझे स्वप्न होते आणि अनेक वर्षांचे हे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मी तुमच्यासमोर माझ्या गावाबद्दल बोलत असल्याचा मला आनंद होत आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com