
South Actor Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला (South Film Industry) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशामध्ये आणखी एका अभिनेत्याचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तमिळ अभिनेता आणि दिग्दर्शक सरन राज (assistant director saran raj) याचा कार अपधातामध्ये (Car Accident) मृत्यू झाला आहे. सरन राज याच्या निधनामुळे ताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ते दु:ख व्यक्त करत आहेत.
दिग्दर्शक वेत्रीमारनचे सहाय्यक दिग्दर्शक आणि सहाय्यक अभिनेते सरन राजचे कार अपघातात निधन झाले आहे. केके नगरमध्ये कार अपघातात अभिनेत्याचा मृत्यू झाला. पलानीप्पन या सहाय्यक अभिनेत्याने दारूच्या नशेत आपली कार सरन राज यांच्या बाईकला धडकवली. या अपघातामध्ये सरन राज गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्राव झाल्यामुळे सरन राज यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सरन राजला शासकीय रॉयपेट्टा रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सरन राजचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पलानीप्पन या सहाय्यक अभिनेत्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झाला. सरन राज केके नगरमधील अर्कोट रोडवरून जात असताना हा अपघात झाला. सरन राज हा मदुरावायल येथील धनलक्ष्मी स्ट्रीट येथे राहत होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
अपघाताच्या वेळी सरन राजने हेल्मेट घातले नव्हते. अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. वेत्री मारन हे देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. सरन राजने त्यांच्या प्रसिद्ध चित्रपट 'वडा चेन्नई'मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. वादा चेन्नई' आणि 'असुरन'मध्येही त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.