TMKOC: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो लोकप्रिय शो आहे. गेली १४ वर्षे हा शो त्यामधील पात्रांमुळे चर्चेत आला आहे. शोमधील प्रत्येक पात्रांची विशेष अशी ओळख आहे. या शोबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या शोमधील लोकप्रिय जेठालालच्या भूमिकेत असणारे दिलीप जोशीच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मालिकेत जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांच्या जीवाला धोका आहे. एका अज्ञात व्यक्तीने नागपुर कंट्रोल रुमला कॉल करुन २५ लोक हत्यारांसहीत दिलीप जोशी यांच्या घराबाहेर उभे असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर नागपूर पोलीस अर्लट झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्चला नागपुर कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून २५ लोक हत्यारांसहित दिलीप जोशी यांच्या शिवाजी पार्क येथील घराबाहेर उभे असल्याची माहिती दिली आहे.अलिकडेच अमिताभ आणि धर्मेंद्र याच्या जिवाला धोका असल्याचे समोर आली होती. माहितीनुसार, दिलीप जोशीच्या घराच्या आजू-बाजूला २५ गुंडे फिरताना दिसले आहेत. या गुडांच्या हातात धारदार शस्त्र, बंदूक आणि बॉम्ब देखील असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली आहे.
नागपूर नियंत्रण कक्षाने शिवाजी पार्क पोलिस स्टेशनला अलर्ट केले असून या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. तपासातील प्राथमिक माहिती समोर आली असताना, हे २५ लोक मुंबईत विविध कामे करण्यासाठी आले आहेत, असे काही लोकांनी बोलताना ऐकले. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले की, हा क्रमांक कथितरित्या नवी दिल्लीतील एका सिमकार्ड कंपनीत काम करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा आहे.
१ मार्च रोजी नागपूर कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिलीप जोशी यांच्या घराबाहेर २५ लोक हत्यारे घेऊन उभी असल्याची माहिती दिली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव काटके असे सांगितले 'ज्या व्यक्तीने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती त्याच व्यक्तीने हा फोन केला आहे' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणानंतर या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेतवाढ केली.