Sulochana Latkar Funeral Update: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्यावर सोमवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना दीदी आपल्या अनेक आठवणी मागे सोडून अनंतात विलीन झाल्या. चित्रपट सृष्टीतील दिग्गज, राजकीय मंडळी, तसेच सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत सुलोचना दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाला विद्युत दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ, मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे, अभिनेते सचिन पिळगांवकर, मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली.” (Entertainment News)
ते म्हणाले, “ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणाऱ्या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे.” (Latest Marathi News)
सुलोचना लाटकर यांचा जन्म २० जुलै १९२८ रोजी झाला. सुलोचना यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००४ मध्ये फिल्मटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सुलोचना दीदींनी २५० हिंदी आणि ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. १९३२ मध्ये माधुरी या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय अवघं ४ वर्ष होतं.
लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम केल्याने सुलोच दीदींनी खूप नाव मिळवलं. त्यामुळेच त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. एक दशकाहून अधिक काळ मुख्य अभिनेत्रीची भूमिका केल्यानंतर, त्यांनी त्या काळातील सुनीत दत्त आणि देव आनंद यांसारख्या सुपरस्टार्सच्या आईची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यातही सुलोचना दीदींनी बऱ्यापैकी यश मिळवलं.
सुलोचना दीदींनी जवळपास सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत २५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्या एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री देखील होत्या. त्यांनी ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. मेरे जीवन साथी, कटी पतंग, प्रवेश आणि त्याग यासारख्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या. (Movie)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.