Rupali Bhosale New Look: 'आई कुठे काय करते'मधील संजनाचा मेकओव्हर: काय आहे नव्या लूकमागील खरं कारण...

रुपाली भोसलेच्या नवीन लूकची चर्चा, कारण जाणून घेण्यासाठी चाहते आहेत उत्सुक.
Rupali Bhosale
Rupali BhosaleSaam Tv

मुंबई: स्टार प्रवाहावरील मालिका (Program) 'आई कुठे काय करते' ही महाराष्ट्रातील अनेक घरात पाहिली जाते. त्यातील देशमुख कुटुंब, आपले कुटुंब आहे असे अनेकांना वाटत असेल. मालिकेतील प्रत्येक पात्राशी प्रेक्षक स्वतःला रिलेट करतात. या मालिकेतील संजना हे पात्र नेगेटिव्ह भूमिका साकारत असले तरी या पात्राने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. संजनाचे बिनधास्त आणि रोखटोक बोलणे प्रेक्षकांना त्या पात्राच्या अजून जवळ घेऊन जाते. मालिकेत हे पात्र रुपाली भोसले साकारत आहे. सध्या रुपालीच्या नव्या लूकची (New Look) सगळीकडे चर्चा होत आहे.

रुपालीने काही दिवसांपूर्वी तिच्या या वेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला होता. रुपालीने हा लूक नेमका का केला आहे?, 'आई कुठे काय करते' मालिकेमधील हे पात्र काही वेगळे वळण घेत आहे का?, असे अनेक प्रश्न मालिकेच्या (Serial) चाहत्यांना पडले आहेत. तिच्या या लूकविषयी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रुपालीच्या बदलेल्या लूकमागचे नेमके कारण आता समोर आले आहे.

Rupali Bhosale
Urvashi Rautela Dance Video: डान्स करता करता उर्वशी रौतेलाने हद्दच केली पार, बोल्ड अदांमधील व्हिडिओ झाला व्हायरल

'प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्या'साठी रुपालीने हा स्पेशल लूक केला आहे. एव्हरग्रीन चित्रपट 'अशी ही बनवाबनवी'तील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर रुपाली, भूषण प्रधानसोबत डान्स करणार आहे. यासाठी रुपालीने हा लूक केला आहे. सुप्रिया पिळगावकर यांचा हा लूक रुपाली सादर करणार आहे.

रुपाली या डान्स परफॉर्मन्ससाठी खूप उत्सुक आहे. रुपाली पहिल्यांदाच असा हटके प्रयेक करत आहे. ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२’ हा सोहळा रविवार १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर या वाहिन्यांवर दाखविण्यात येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com