BMC ची सोनू सुदला नोटीस; अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

बीएमसीचा आरोप आहे की सोनू सुदने जुहूमधील आपल्या 6 मजली निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतरण केले आहे.
सोनू सुद
सोनू सुदSaam Tv

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Bollywood Actor Sonu Sood) याच्याविरोधात नोटीस बजावली आहे. बीएमसीचा आरोप आहे की सोनूने जुहूमधील आपल्या 6 मजली निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतरण केले आहे. इमारतीत अनाधिकृत बांधकाम केल्याचा आरोपही आहे. सोनू सूद दररोज चर्चेत असतो. गरजू, अडचणीत असलेल्या आणि गरीब लोकांना नेहमिच मदत करत असतो.

माध्यमाच्या वृत्तानुसार, सोनू सूद यांनी केवळ दोन आठवड्यांतच आपल्या निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप बीएमसीने केला आहे. ज्यामुळे अभिनेत्याला नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात सोनू सूदने बीएमसीच्या नियमांचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. बीएमसीचे म्हणणे आहे की त्याने नियमांचे उल्लंघन करून हॉटेल बनविले आणि अनधिकृत बांधकामही केले आहे.

सोनू सुद
मनसे म्हणते...'बीग बी' शो 'बीग हार्ट'.....(पहा व्हिडिओ)

बीएमसीने सोनूला नोटीस देऊन म्हटले आहे संबंधित इमारतीला पुन्हा रेसिडेंशियल बनवावे. तसेच सर्व अनधिकृत बांधकामे आणि बदल त्वरित थांबवावा. पश्चिम उपनगराच्या बांधकाम प्रस्ताव विभागाचे उपमुख्य अभियंता म्हणाले की, पालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आयुक्त पुढे म्हणाले की, सहाय्यक मनपा आयुक्तांकडून आदेश देण्यात आले आहेत की जर काही अनधिकृत बांधकाम झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करावी.

उपमुख्य अभियंत्यांनी सोनू सूदला 15 दिवसात अनधिकृत कामे थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याने नियम न पाळल्यास पालिका कोणतीही सूचना न देता पुढील कारवाई करेल. महापालिकेच्या या नोटीसमुळे सोनू सूदच्या अडचणी वाढल्या आहेत हे स्पष्ट झाले आहे. या व्यतिरिक्त कोरोना रूग्णांना ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर सारखी जीवनरक्षक औषधे पुरविण्याबाबत सोनू सूद चर्चेत आहे. नुकतचं मुंबई हायकोर्टाने सोनूवर औषधं दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com