Siddharth Shukla: आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार
Siddharth Shukla: आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार Saam Tv

Siddharth Shukla: आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार

टीव्ही आणि चित्रपटात काम केलेला प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस 13' चे विजेता सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नाही.
Published on

मुंबई : टीव्ही आणि चित्रपटात काम केलेला प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस 13' चे विजेता सिद्धार्थ शुक्ला Siddharth Shukla Death आता आपल्यात नाही. सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदयविकाराच्या Heart Attack झटक्याने निधन झाले असे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे चाहत्यांपासून ते सेलेब्सपर्यंत सर्वजण शोकसागरात आहेत.

बिग बॉस 13 नंतर अभिनेत्याच्या कारकिर्दीला नवीन उड्डाण मिळाले. आता सिद्धार्थ शुक्लाचे अंतिम संस्कार Siddharth Shukla Funeral आज केले जाणार आहेत.

हे देखील पहा-

अंत्यसंस्कार आज 11 वाजता होणार;

आज सकाळी 11 वाजता त्याचे पार्थिव कुटुंबाला सुपूर्द केले जाणार आहे. असे म्हटले जात आहे की पोस्टमार्टम अहवालाच्या Postmortem Report आधारे, मुंबई पोलिस त्याच वेळी आपले अधिकृत निवेदन देखील जारी करू शकतात.

बातमीनुसार, दिवंगत अभिनेत्याचा मृतदेह सकाळी 9 च्या सुमारास ब्रह्मा कुमारी कार्यालयात नेण्यात येईल. पूजेचे पठण होईल, त्यानंतर त्याचे पार्थिव घरी नेले जाईल. सिद्धार्थचे घर ओशिवरा येथे असून त्याच्यावर ओशिवरा येथील वैकुंठभूमी वारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातमीनुसार, सिद्धार्थ शेवटच्या वेळी रात्री आईसोबत फिरताना दिसला होता.

Siddharth Shukla: आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार
राज्यात उद्यापासून सलग तीन दिवस पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांच्या मते, सिद्धार्थ बुधवार संध्याकाळपर्यंत ठीक होता आणि रात्री 3-4 वाजता त्याला थोड अस्वस्थ वाटू लागल. त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने थंड पाणी मागितले आणि झोपी गेला. त्यानंतर पुन्हा सकाळी त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली आणि पाणी मागितले. पाणी पिताना तो अचानक बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे भरतीपूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com