Shraddha Kapoor Get Trolled: 'किती बकवास गाणं आहे', 'तू झुठी मैं मक्कर'मधील नवीन गाणे प्रदर्शित होताच श्रद्धा झाली ट्रोल

चित्रपटातील एका नवीन गाण्यामुळे श्रद्धा कपूरला ट्रोल केले जात आहे.
Netizens troll Shraddha Kapoor after new song release from Tu Jhoothi Main Makkaar
Netizens troll Shraddha Kapoor after new song release from Tu Jhoothi Main MakkaarInstagram @shraddhakapoor

Maine Pi Rakhi Hai Got Trolled: बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांच्या 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटाला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. रणबीर कपूरची इमेज इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय अशी आहे. सोशल मीडियावर सक्रिय नसलेल्या या अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित झाला की त्याचे चाहते त्याला सपोर्ट करतातच. या चित्रपटातून रणबीर पहिल्यांदाच श्रद्धासोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. परंतु आता या चित्रपटातील एका नवीन गाण्यामुळे श्रद्धा कपूरला ट्रोल केले जात आहे.

'तू झुठी मैं मक्कर' चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहेत. हा चित्रपटाची लोकांमध्ये खूप चर्चेत आहे, पण चित्रपटातील गाणी मात्र लोकांना आवडलेली नाहीत. आता या चित्रपटाचे एक नवीन गाणे देखील रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये श्रद्धा कपूर मद्यधुंद अवस्थेत डान्स करताना दिसत आहे. हे गाणे वीकेंडला रिलीज करण्यात आले आहे.

Netizens troll Shraddha Kapoor after new song release from Tu Jhoothi Main Makkaar
Oscars Awards 2023: कधी, केव्हा आणि कुठे पहाल ऑस्कर पुरस्कार सोहळा, जाणून घ्या सविस्तर

विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे खास गाणे तरुणांसाठी चित्रीत करण्यात आले आहे. या नव्या गाण्यातही श्रद्धा आणि रणबीरची जोडी धमाल करताना दिसत आहे. 'पक्की है मैने पी रखी है' असे या गाण्याचे शीर्षक आहे. नव्याने रिलीज झालेल्या या गाण्यात श्रद्धा वाइनचा ग्लास घेऊन नाचताना दिसत आहे. श्रद्धाच्या चाहत्यांना हे गाणे फारसे आवडलेले नाही.

श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हे नवीन गाणे शेअर केले, त्यानंतर चाहत्यांनी तिला गाण्याचे बोल आणि श्रद्धाच्या परफॉर्मन्ससाठी ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने कमेंट केली की, 'मी डिसलाइक बटन दाबत आहे.' दुसऱ्या यूजरने कमेंट केली, 'फक्त गाणी तयार करा, त्याला अर्थ आहे नाही याच्याशी काही देणं-घेणं नाही' अशी कमेंट युजरने केली, 'अजून किती फालतू गाणी येणार आहेत, या चित्रपटातील एकच गाणे चांगले आहे. अशा कमेंट युजर्स करत आहेत.

इतकंच नाही तर काही यूजर्सनी गाण्याच्या कोरिओग्राफीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रद्धाला प्रचंड ट्रोल केलं आहे. एका यूजरने म्हटले की, 'श्रद्धाचा एअरपोर्ट लूक यापेक्षा चांगला आहे, लोकांना दारू पिताना पाहून मस्त का वाटतंय.' 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटाला होळीच्या दिवशी रिलीज करण्यात आला. चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com