ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
माधवी गोगटे
माधवी गोगटेSaam Tv
Published On

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात Hospital उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे.

हे देखील पहा -

माधवी गोगटे यांचा जन्म 7 ऑगस्ट 1964 रोजी झाला. माधवी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर 1990 मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

माधवी गोगटे
Washim: रिसोड येथील बिछायात केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग

आतापर्यंत माधवी गोगटे यांनी अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. त्यांची ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही मराठी नाटकं त्याकाळी तुफान गाजली. माधवी गोगटे यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांची भूमिका असलेल्या अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटही सुपरहिट ठरले.

Editded By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com