Chhaava : थिएटरमध्ये 'छावा'चा शो सुरू असताना स्क्रीनला लागली आग, चित्रपटगृहात नेमकं घडलं काय?

Select City Walk Theatre Fire: 'छावा' चित्रपटाच्या शो दरम्यान थिएटरमध्ये आग लागली आहे. नेमकं त्यावेळी काय घडले जाणून घेऊयात.
Select City Walk Theatre Fire
ChhaavaSAAM TV
Published On

विक्की कौशलचा (vicky kaushal) 'छावा' (Chhaava ) चित्रपट सध्या थिएटर गाजवत आहे. चित्रपट आता लवकरच 400 कोटींचा टप्पा पार करणार आहे. थिएटरमध्ये 'छावा' चित्रपटाचे हाऊसफुल पाहायला मिळत आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. 'छावा' चित्रपट पाहत असताना चक्क स्क्रिनने पेट घेतला आहे. 'छावा' चित्रपटाच्या क्लायमॅक्स वेळी थिएटरमधल्या स्क्रिनने पेट घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सिलेक्ट सिटीवॉक मॉलमध्ये (Select City Walk Theatre) बुधवारी संध्याकाळी एका सिनेमा हॉलमध्ये 'छावा'चं स्क्रिनिंग सुरू होते. तेव्हा चित्रपट शेवटच्या टप्प्यावर असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे अचानक आग लागली. स्क्रिनला लागलेल्या आगीमुळे थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि लोक घाबरून पळू लागली. तसेच मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करू लागले.

नेमकं घडलं काय?

मीडिया रिपोर्टनुसार, आग लागल्यामुळे हॉलमध्ये फायर अलार्म वाजला, जो ऐकून सर्वजण बाहेर पळू लागले. त्यानंतर दिल्ली अग्निशमन दलाच्या मदतीने आग विजवण्यात आली. अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना संध्याकाळी 5.42 वाजता आगीबद्दल फोन आला. ते लोक त्वरित सहा गाड्या घेऊन घटनास्थळी पोहचले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली.

दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिसांना संध्याकाळी 5.57 वाजता सिटीवॉक मॉलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. काही लोक आत थिएटरमध्ये अडकली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यात आली.

Select City Walk Theatre Fire
Chhaava : 'छावा'ची डरकाळी आता टॉलिवूडमध्ये ऐकू येणार, चित्रपटाची रिलीज डेट काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com