'83' पाहून सचिन झाला भावूक, त्या कुरळ्या केसांच्या मुलाची सचिनला झाली आठवण...

'83' Movie: या चित्रपटातील रणवीरची कामगिरी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही भारावला आहे.
Sachin Tendulkar Likes '83' Movie And Ranveer Singh's Acting
Sachin Tendulkar Likes '83' Movie And Ranveer Singh's Acting Saam Tv
Published On

भारतात क्रिकेटला धर्म मानलं जातं. क्रिकेट बघताना आपण भारतीय लोक अगदी स्वतःच क्रिकेट खेळत आहोत असंच आपल्याला वाटत असतं. भारताने १९८३ मध्ये जेव्हा पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला तेव्हा अवघ्या भारताने तो आनंदोत्सव साजरा केला. तेव्हाचे टीम इंडियाचे कॅप्टन कपिल देव (Kapil-dev) यांचा भारताच्या विजयात मोठा वाटा होता. १९८३ याच वर्ल्डकपवर (1983 Worldcup) आधारीत '83' ('83' Movie) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यात अष्टपैलू अभिनेता रणवीस सिंह याने कपिल देव यांची भुमिका साकारली आहे. या चित्रपटातील रणवीरची कामगिरी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही (Sachin Tendulkar) भारावला आहे. सचिनला हा चित्रपट पाहून कुरळ्या केसांच्या एका लहान मुलाची आठवण आली असं ट्विट सचिनने केलं, तो लहान मुलगा दुसरा - तिसरा कुणीही नसून स्वतः सचिन आहे. (Seeing '83' movie, Sachin became emotional, he remembered that curly haired boy)

हे देखील पहा -

रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिकाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट '83' सचिनने नुकताच पाहिला. हा चित्रपट पाहून सचिन भारावून गेला. या चित्रपटाबाबत सचिननं ट्विट केलं की, "83 मध्ये रणवीर सिंहचा एक छान सुंदर असा अष्टपैलू परफॉर्मन्स. खरोखरच कपिल देव यांच्या गुणांना मूर्त रूप देत आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाच्या प्रतिष्ठित क्षणांची आठवण झाली. मला माहित आहे की, या विजयाने त्या लहान मुलाला खरोखर प्रेरणा दिली." असं ट्विट त्याने केलं आहे.

सचिनच्या या कौतुकाच्या थापेनंतर रणवीरनेही सचिनला धन्यवाद देत ट्विट केलं की, "…आणि मग तो लहान मुलगा पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिला. धन्यवाद, मास्टर! माझ्यासाठी याचा अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे."

१९८३ वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिनलाही त्यातून प्रेरणा मिळाली आणि मग पुढे सचिननेही क्रिकेट विश्वात आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं. त्यामुळे 83 चित्रपट पाहून सचिनला आपलं बापपण आठवलं आणि तो भावूक झाला. (Ranveer Singh Latest News)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com